शेतकऱ्यांच्या शेतावर शेती दिन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:49 IST2018-11-06T22:47:14+5:302018-11-06T22:49:28+5:30
धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाने संशोधीत केलेल्या नविन धान वाण साकोली ९ व तुडतुड्याला प्रतिकारक धान वाण पिकेव्ही गणेश या वाणाचा प्रचार, प्रसार, क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी अखिल भारतीय भात समन्वयक प्रकल्प हैद्राबाद यांच्याकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत .....

शेतकऱ्यांच्या शेतावर शेती दिन कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाने संशोधीत केलेल्या नविन धान वाण साकोली ९ व तुडतुड्याला प्रतिकारक धान वाण पिकेव्ही गणेश या वाणाचा प्रचार, प्रसार, क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी अखिल भारतीय भात समन्वयक प्रकल्प हैद्राबाद यांच्याकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी संधोधन केंद्र, साकोली यांचे मार्फत भंडारा जिल्ह्यातील सालेभाटा, राजेगाव, मानेगाव, बोरगाव, आलेसुर, रेंगेपार, चिखलाबोळी येथे खरिप २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर साकोली ९ या धान वाणाचे १० हेक्टर क्षेत्रावर (१८ शेतकरी) व पिकेव्ही गणेश वाणाचे ५ हेक्टर क्षेत्रावर (५ शेतकरी) प्रथम रेषीय प्रात्याक्षिक घेतले आहे. त्या अनुषंगानेसालेभाटा, राजेगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतावर शेती दिनाचे आयोजन करण्यात आले.
सालेभाटा येथे रुपचंद निर्वाण यांच्या शेतावर शेती दिनाच्या कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. जी. आर. शामकुंवर, वरिष्ठ भात पैदासकार, ए. डी. बनगीनवार, कनिष्ठ संशोधन सहा. ललित राहांगडाले, टेंभुर्णे, उपसरपंच तसेच ए. के. सहारे, मं.कृ.अ. लाखनी, एन. डी. भोंगाडे, मोहीत महल्ले व गावातील शेतकरी उपस्थित होते. डॉ. शामकुवर यांनी विद्यापिठ संशोधीत धान वाणाविषयी संपूर्ण माहती देऊन पट्टा पध्दतीचा अवलंब करण्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मागील वर्षी भंडारा जिल्ह्यात भात पिकावर मोठ्या प्रमाणावर गादमाशी व तुडतूड्याच्या प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे विद्यापिठानी संशोधीत केलेल्या गादमाशी, तुडतूडा, करपा, कडाकरपा, खोडकिडी यांना प्रतिकारक, रासायनिक खताच्या कमी वापर करुन व फवारणीचा खर्च कमी करुन अधिक उत्पन्न घेण्यासाठी साकोली ९ व पिकेव्ही गणेश या वाणाचा लागवड शेतकऱ्यांनी करावी असे आवाहन केले व शेतामध्ये लागवड केलेले दोनही वाण किड व रोगमुक्त असल्याचे प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना दाखविले. त्याप्रमाणे त्यांनी हलक्या ते मध्यम भात वाणांची लागवड, पाणी, खत किड रोगाचे व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रात्याक्षीक लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यापिठ धान वाणावर किड रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला नाही असे सांगितले. तसेच या वाणांना रासायनिक खते सुध्दा कमी दयावी लागली. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग लाभला.
त्यानंतर आभार प्रदर्शन करण्यात आले. राजेगाव येथील शेतीदिन मिनाक्षी बोपचे, सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.
या शेतीदिनास डॉ. शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार यांनी मार्गदर्शन केले आणि शेतकºयांनी विचारलेल्या प्रश्नावर समाधानकारक चर्चा करण्यात आली. धनपाल बोपचे यांच्या शेतावरील पिकेव्ही गणेश या वाणाच्या प्रथम रेषीय प्रात्याक्षिकांची शेतकºयांसोबत जावून पाहणी केली असता या धान वाणावर किड व रोगाचा प्रादुर्भाव आढळला नाही. रासायनिक खते सुध्दा कमी लागली. या दोन्ही ठिकाणच्या शेतीदिन कार्यक्रम शेतकरी बांधवाकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शेतकऱ्यांना या दोन्ही वाणापासून भरपूर उत्पादन मिळण्याची आशा व्यक्त केली.