शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत चौकशी समित्यांचा फार्स

By admin | Updated: September 25, 2016 00:50 IST

जिल्हा परिषदेत चौकशी समित्यांचा केवळ ‘फार्स’ सुरू आहे. या समित्यांचे ‘आॅऊटपूट शून्य' असल्याने या समित्या का नेमल्या जातात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अघोषित परंपरा सुरू : पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी कायदे गुंडाळले बासनात भंडारा : जिल्हा परिषदेत चौकशी समित्यांचा केवळ ‘फार्स’ सुरू आहे. या समित्यांचे ‘आॅऊटपूट शून्य' असल्याने या समित्या का नेमल्या जातात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाणारी जिल्हा परिषद सामान्य नागरिकांची हक्काची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सामान्य जनतेचे प्रतिनिधी तेथे त्यांचे प्रतिनिधीत्व करतात. जिल्हा परिषदेची नाळ ग्रामीण जनतेशी जुळलेली आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका निभावते. ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषदेबाबत आपुलकी आहे. परिणामी दररोज जिल्हा परिषदेत ग्रामीणांची वर्दळ असते. तिथे समस्या सुटेल, अशी भाबडी अपेक्षा त्यांना असते. मात्र या ठिकाणी समस्या सुटतच नाही.जिल्हा परिषदेत स्थायी समितीसह विविध समित्या आहेत. त्यात सदस्य प्रश्न उपस्थित करतात. समस्येच्या निराकरणासाठी अनेकदा विषय समित्या चौकशी समिती नेमतात. त्यातूनही समस्या न सुटल्यास जनतेच्या समस्यांबाबत सदस्य सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करतात. त्यावर अधिकारी उत्तरे देतात. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास संबंधित समस्येची तड लावण्यासाठी तडकाफडकी चौकशी समिती नेमली जाते. समिती चौकशीच्या कामी लागते. मात्र ती समिती वैध की अवैध, समितीला कोणते अधिकार आहेत, याबाबत सदस्यांसह अधिकारी अनभिज्ञ असतात. त्यातून त्या समितीचा मूळ उद्देशच हरविला जात आहे.सर्वसाधारण सभेला केवळ दोन चौकशी समिती नेमण्याचा अधिकार आहे. मात्र हे अधिकार बासनात गुंडाळून चौकशी समिती नेमली जाते. संबंधित समिती व सर्वसाधारण समितीचे सचिव केवळ परंपरा म्हणून सदस्यांनी आक्रमक रूप घेताच चौकशी समिती नेमून मोकळे होतात. यातून महाभारत घडत असल्याचे प्रकार दिसून आले आहे. (नगर प्रतिनिधी) कायद्यापेक्षा परंपराच श्रेष्ठ जिल्हा परिषदेचे कामकाज संविधानानुसार चालते. मात्र चौकशी समिती गठित करताना परंपरेनुसार त्या नेमण्यात आल्याची कबुली अधिकारी देतात. परंपरा श्रेष्ठ की कायदा, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होता. भंडारा तालुक्यातील दवडीपार येथे लस प्रकरण, लघू पाटबंधारे विभागातील निविदा प्रकरण, ग्रामसेवक मारहाण प्रकरण असे कितीतरी प्रकरणासाठी चौकशी समिती गठित करण्यात आली. परंतु त्याचे नंतर काय झाले हे कुणालाही कळले नाही. विशेष म्हणजे या चौकशी समितीचे आॅऊटपूट शून्य असल्याने आता अशा समित्यांचीच चौकशी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.