त्या आपद्ग्र‌स्त शेतकऱ्याचे कुटुंब रात्रभर उपाशीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:41+5:302021-04-02T04:37:41+5:30

मंडळ अधिकारी एम.बी. रघुवंशी, सहायक गटविकास अधिकारी डी.एम. खोटेले, पंचायत विस्तार अधिकारी डी.आर. लंजे यांनी प्रशासनाच्या ...

The family of the affected farmer went hungry all night | त्या आपद्ग्र‌स्त शेतकऱ्याचे कुटुंब रात्रभर उपाशीच

त्या आपद्ग्र‌स्त शेतकऱ्याचे कुटुंब रात्रभर उपाशीच

मंडळ अधिकारी एम.बी. रघुवंशी, सहायक गटविकास अधिकारी डी.एम. खोटेले, पंचायत विस्तार अधिकारी डी.आर. लंजे यांनी प्रशासनाच्या आदेशानुसार, या शेतकऱ्याच्या शेतातील निवासस्थान असलेली झोपडी शुक्रवारी जमीनदोस्त केली. या निवासस्थानी जीवनावश्यक वस्तू असलेले तांदूळ, गहू, गव्हाचे पीठ, तूरडाळ, धान व इतर वस्तू जप्त केल्या.

या वस्तू जीवनावश्यक असल्यामुळे त्या आपद्ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला देणे भाग होते, परंतु या अधिकाऱ्यांनी तसे न करता, त्या सर्व जीवनावश्यक वस्तू जप्त करून त्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. पुढील आदेश येईपर्यंत त्या कुणालाही देण्यात येऊ नये, असे लेखी आदेशही दिले.

घरातील असलेले अन्नधान्य प्रशासनाने जप्त केल्यामुळे व घरात कोणतेही इतर धान्य उरले नसल्यामुळे त्या शेतकरी कुटुंबाला उपाशीपोटीच रात्र काढावी लागली. या कृतीचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून, याप्रकरणी दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: The family of the affected farmer went hungry all night