बनावट आयुर्वेदीक औषधींची विक्री
By Admin | Updated: August 14, 2014 23:35 IST2014-08-14T23:35:01+5:302014-08-14T23:35:01+5:30
बाजारपेठेत वस्तुमध्ये भेसळ व बनावटीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही बनावट आता वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा सुरू झाली आहे. आयुर्वेदाच्या नावाखाली अनेक परप्रांतीय वैद्य ग्रामीण तथा शहरी

बनावट आयुर्वेदीक औषधींची विक्री
मुरमाडी : बाजारपेठेत वस्तुमध्ये भेसळ व बनावटीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही बनावट आता वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा सुरू झाली आहे. आयुर्वेदाच्या नावाखाली अनेक परप्रांतीय वैद्य ग्रामीण तथा शहरी भागातील नागरिकांना जुन्या व असाध्य रोगावर हमखास उपचार करण्याची बतावणी करून आयुर्वेदीक असल्याचे सागून मोठी रक्कम घेवून औषधाची विक्री करीत आहेत. मात्र औषणामुळे रुग्णाना कुठलाही फायदा न होत असल्याचे ग्रामीण भागात बोलले जाते. वाढत्या वयानुसार विविध आजाराला नागरिकांना समोरे जावे लागते ही वस्तुस्थिती आहे.
माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर अनेक असाध्य रोग उद्भवतात. या रोगावर अॅलोपॅथी औषणाद्वारे उपचार केला जातो. मात्र औषणामुळे काही रोगावर रामबाण ईलाज होत नाही. यामध्ये प्रामुख्याने भंगंदर, मुळव्याध, साधेवात, मधुमेह, गुप्तरोग दमा यासारख्या रोगाचा समावेश आहे. त्यामुळे या रोगाने त्रस्त रुग्ण रोग बरा होण्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्चून औषधे घेतात. याचाच फायदा घेत परप्रांतीय वैद्यानी दुकाने थाटून येणाऱ्या रुग्णाना कुठल्याही रोगावर रामबाण आजार बरान झाल्यास घेतलेली रक्कम परत देण्याच्या मोठमोठ्या भुलथापा मारून रुग्णास औषधी घेण्यास भाग पडतात. हे जडीबुडी विक्रेते ग्रामीण भागात फिरून फसवणूक करीत आहेत. या औषधामध्ये स्ट्रीरॉईड नावाच्या ड्रॅगाचा वापर हे विक्रेते करतात. त्यामुळे औषधे सेवन करणाऱ्या रुग्णांना काही काळातच आराम वाटतो. त्यामुळे अशा औषधाना अनेक रुग्ण बळी पडत आहेत.
मात्र त्याच्या कालांतराने आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत असल्याचे वैद्यकीय तझाच्या मत आहे. या वैद्याकडून विकल्या जाणाऱ्या जडीबुटीचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होवू शकतात. याचीही माहिती नसते. त्यामुळे या बनावट आयुर्वेदिक औषधाच्या विक्रीला बंदी घालावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. जडीबुडीच्या नावाखाली नागरिकाच्या आरोग्याशी खेळ परप्रांतीय नागरिकांनी दुकाने थाटून मांडली आहेत. या दुकानात झाडाच्या वाळलेल्या साली, बिया, तेल, चुर्ण असे साहित्य वनऔषधी बहुगूणी आयुर्वेदिक असून हिमालयाच्या जंगलातून आणल्याचा दावा या वैद्याकडून केला जातो. मात्र तात्पुरता आराम देवून रुग्णाच्या जिवनाशी खेळ जडीबुट्टीवाल्याकडून खेळले जात आहे. (वार्ताहर)