शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

उन्हाळी धान उत्पादनात कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:38 IST

पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडल्यामुळे हजारो एकरातील उन्हाळी धानाचे पिक केवळ वीस टक्क्यापेक्षा कमी क्षेत्रावर आले आहे. पवनी तालुक्यात विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाद्वारे पाण्याचे सिंचन करुन उन्हाळी भात शेती घेतली जाते.

ठळक मुद्देसंडे अँकर । चौरास भागातील विहिरींनी गाठला तळ, धान खरेदी केंद्र सुरु नाही, शेतकरी पुन्हा संकटात

खेमराज डोये।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडल्यामुळे हजारो एकरातील उन्हाळी धानाचे पिक केवळ वीस टक्क्यापेक्षा कमी क्षेत्रावर आले आहे.पवनी तालुक्यात विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाद्वारे पाण्याचे सिंचन करुन उन्हाळी भात शेती घेतली जाते. खरीप धान पीक चौरास भागातील मुख्य पीक, तर रब्बी धान पीक म्हणून या भागातील शेतकरी हरभरा, वटाणा, उळीद, मुग, लाख, लाखोरी, गहू, मसूर, पोपट, धना, मोवरी इत्यादी पिके घेत असतात. ही पिके अतिखर्चाची नसल्यामुळे नफ्याची असतात. मात्र पिकांना थंडीची गरज असते. पूर्वीसारखी थंडी पडत नाही. त्यामुळे रब्बी डाळवर्गीय पिके पूर्वीसारखे उत्पादन देत नाहीत. त्यामुळे जे मिळाले ते शेतकरी स्वीकारतात आणि रब्बी पिकांची काढणी झाल्यानंतर या जागेवर उन्हाळी भात पिकाची लागवड करतात.मात्र यावर्षी उन्हाळी भात शेतीला अखेरची घरघर लागली. चौरास भागात अनेक दिवसांपासून विहिरीच्या पाण्यावर विद्युत पंपाच्या सहाय्याने भात शेती घेतली जाते. मात्र गोसे धरणाच्या बांधकामात धरण बनवित असताना भूमीगत सुरु असलेले पाण्याचे झरे बंद झाले. पवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विहिरी टप्प्याटप्प्याने बंद पडत गेल्या.गोसे धरणाला ३१ वर्षाचा कालावधी होऊनही या भागातील शेतीला पाणी मिळत नाही. उन्हाळी शेतीचे क्षेत्र वाढले तेव्हा उष्णामिल, राईस मिल, शेतकरी, शेतमजूर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना काम मिळत होते. आता हे सर्वच बंद पडलेले आहे. धानखरेदी केंद्र सुरु नाही व भावही नाही. ज्या काही शेतकऱ्यांच्या अवघ्या १५ ते २० टक्के विहिरीच्या पाण्यावर धान पिकविण्यात आले. त्याच्या धानाची मोजणी करण्यासाठी शासनाने एकही तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यांचे धान व्यापारी पडक्या भावाने घेत आहेत. त्याची झळ शेतकºयांना पोहचत आहे. ज्यांचे पीक शेतात उभे आहे ते पूर्ण स्वरुपात घरी येईल अशी शेतकºयांना हमी नाही. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात विहिरींनी दम तोडला आहे. सूर्य आग ओकत आहे. विजेचा पुरवठाही आठ तासच मिळत आहे. चौरास भागातील ८० टक्के विद्युत पंप व विहिरी बंद पडल्या आहेत. असे असूनही वीज मंडळाकडून आठच तास वीज पुरवठा होतो. अशीच परिस्थिती राहिली तर उन्हाळी भाताची शेती सुकणार आहे. मड्डा झालेला पिकही शेतकºयाच्या मानगुटीवर बसणार आहे. पावसाळा एक महिना उशिरा गेला तर खरीप भातपिकाच्या नर्सरीसुद्धा करता येणार नाही. त्यामुळे गोसे धरणाचे कालव्यांना पाणी सोडणे गरजेचे झाले आहे.बोनस जाहीर करण्याची मागणीशासनाकडून धान खरेदीवर बोनस स्वरुपात वाढीव रक्कम देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु ही बोनस रक्कम उशिरा घोषणा करून दिली जाते. त्यामुळे धान उत्पादक अर्ध्याधिक शेतकºयांना याचा फायदा मिळत नाही. काही शेतकरी व्यापाºयांनाच धान विकतात. गरजेसाठी त्यांना करावेच लागते. पूर्वीच शासनाने हमी भावाबरोबर बोनसची घोषणा केली तर याचा फायदा सर्वच शेतकºयांना मिळू शकतो. त्यामुळे धानाची खरेदी सुरु झाल्याबरोबर शासनाने बोनसची घोषणा करावी किंवा बोनस मिळणार नाही असे तरी सांगावे. त्यामुळे शेतकºयांवर पश्चातापाची वेळ येणार नाही.

टॅग्स :agricultureशेती