शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:33 IST2018-03-20T22:33:43+5:302018-03-20T22:33:43+5:30
मागासवर्गींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रभावी काम भाजप सरकारने केले असून विविध विकास योजनेच्या माध्यमातून लाभावित केले आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगिण विकासाला गती मिळाली आहे.

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा
आॅनलाईन लोकमत
भंडारा : मागासवर्गींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रभावी काम भाजप सरकारने केले असून विविध विकास योजनेच्या माध्यमातून लाभावित केले आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगिण विकासाला गती मिळाली आहे. त्याचबरोबर डॉॅ.बाबासाहेबांच्या समतेचा विचाराला जागर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याकरिता त्यांच्या स्मृती स्थळाचा विशेष दर्जा देवून विकास केला जात आहे. सरकारने सुरु केलेल्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन जि.प. सदस्य व अनुसूचित जाती मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.नेपाल रंगारी यांनी केले. तुमसर येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीमध्ये ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा ची तालुका कार्यकर्ता बैठक तुमसर येथे भाजपा अनु. जाती. मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.नेपाल रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पटले, पंचायत समिती सभापती रोशना नारनवरे, जिल्हा महामंत्री हंसराज वैद्य, सुरेश गजभिये, तालुका महामंत्री साधना वालदे, हेमराज तिरपुडे, सरपंच मुरली राजेश बारमाटे, नितीन गणवीर, गोंदेखारी सरपंच मानिक तांडेकर, हरिश डोंगरे, नरेंद्र गणवीर, लोभी सरपंच राजू देशभ्रतार, ओमप्रकास भावतकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पं.दिनदयाल उपाध्याय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांचे समस्या व सूचना जिल्हाध्यक्ष नेपाल रंगारी यांनी जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद विसरून प्रथम पक्ष या माध्यमातून पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र येवून कार्य करण्याचे सांगितले.
भाजपा अनु. जाती मोर्चाच्या तालुका बैठकीला पदाधिकारी सरपंच ग्रा.पं. सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार दिपक घोडीचोर यांनी मानले.