सिलेंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त, सुदैवाने जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 14:58 IST2021-09-27T14:53:39+5:302021-09-27T14:58:22+5:30
लाखनी येथील आंकोश शिवनाथ आत्राम यांच्या राहत्या घरी सकाळी ७ च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेच्या वेळी घरातील सर्व मंडळी बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.

सिलेंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त, सुदैवाने जीवितहानी नाही
भंडारा : लाखनी तालुक्यातील गुरढा येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घरच उद्ध्वस्त झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता घडली. सुदैवाने जीवितहानी टळली.
माहितीनुसार, आंकोश शिवनाथ आत्राम यांच्या राहत्या घरी सकाळी ७ च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेच्या वेळी घरातील सर्व मंडळी बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.
या स्फोटात घरातील अन्नधान्य, कपडे, कपाट यासह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. सदर घटनेची माहिती मिळताच लाखनी येथील नायबतहसीदार उरकुडकर, समन्वयक नरेश नवखरे, तलाखी देशमुख, सरपंच श्रीराम बावनथडे यांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली.