राष्ट्रीय खेळाडूला मदतीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:10 IST2018-11-09T22:10:27+5:302018-11-09T22:10:44+5:30
कराटे स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या खेळाडूला मदतीची गरज आहे. अंकिता गौतम खोब्रागडे असे या खेळाडू मुलीचे नाव असून तिची इंटरनॅशनल कराटे स्पर्धे अंतर्गत निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय खेळाडूला मदतीची अपेक्षा
भंडारा : कराटे स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या खेळाडूला मदतीची गरज आहे. अंकिता गौतम खोब्रागडे असे या खेळाडू मुलीचे नाव असून तिची इंटरनॅशनल कराटे स्पर्धे अंतर्गत निवड करण्यात आली आहे. अंकिता ही ठाणा जवाहरनगर येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. नेपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिला जायचे आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नसल्याने तिने मदतीची अपेक्षा केली आहे. सोतोकान कराटे इंटरनॅशनल आॅफ इंडियामध्ये भंडारा जिल्ह्यातून तिची भारतीय संघात निवड झाली आहे.