भंडारा- तुमसर- बालाघाट रस्त्याचे हाेणार विस्तारीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST2022-03-07T05:00:00+5:302022-03-07T05:00:53+5:30

जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहर ते तुमसर शहराला जाेडून ते मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्याला जाेडण्यात येणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे, अशी बरीच जुनी मागणी आहे. नॅशनल हायवे अथाॅरिटी ऑफ इंडियाने या मार्गाचे चाैपदरीकरण करण्यासाठी याेजनेला अंतीम रुप दिले आहे. भंडारा बाहेरुन नुकत्याच ४२१ काेटींच्या बायपास बांधकामाला सुरुवात झाली आहे.

Expansion of Bhandara-Tumsar-Balaghat road | भंडारा- तुमसर- बालाघाट रस्त्याचे हाेणार विस्तारीकरण

भंडारा- तुमसर- बालाघाट रस्त्याचे हाेणार विस्तारीकरण

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आंतरराज्यीय रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा-तुमसर ते बालाघाट पर्यंतच्या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात डीटेल्स प्लॅन रिपाेर्ट (डीपीआर) तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. उल्लेखनीय म्हणजे भंडारा- तुमसर या २७१ या राज्यमार्गाचे रुपांतरनही राष्ट्रीय महामार्गात केले जाणार आहे.
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहर ते तुमसर शहराला जाेडून ते मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्याला जाेडण्यात येणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे, अशी बरीच जुनी मागणी आहे. नॅशनल हायवे अथाॅरिटी ऑफ इंडियाने या मार्गाचे चाैपदरीकरण करण्यासाठी याेजनेला अंतीम रुप दिले आहे. भंडारा बाहेरुन नुकत्याच ४२१ काेटींच्या बायपास बांधकामाला सुरुवात झाली आहे. याचवेळी भंडारा- तुमसर - बालाघाट मार्गाचेही चाैपदरीकरण करण्यात येईल, अशी घाेषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. 
भंडारा शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या राज्य मार्गाचे जाेडणी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ ला करण्यात येणार आहे. खापा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ला जुडवून तुमसर व नंतर सिहाेरा आणि मध्यप्रदेशच्या सिमेपर्यंत या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करुन जाेडण्यात येणार आहे. 
विद्यमान स्थितीत भंडारा ते तुमसर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणाहून उखडलेल्या रस्त्याची अधूनमधून डागडुजी करण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दाेन राज्यांना जाेडणारा हा आंतरराज्यीय महत्वपूर्ण असतानाही दाेन दशकापासून या रस्त्याचे विस्तारीकरण रखडल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले हाेते. धान उत्पादक शेतकऱ्यांनाही या रस्त्याहून आवागमन करणे कठीण जाते. रस्त्याचे बांधकाम झाल्यास आवागमन हाेणे सुलभ तर हाेईलच या शिवाय वेळेचीही बचत हाेणार आहे. 
बालाघाट जिल्ह्याला जाेडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव २०१९ मध्येच तयार करण्यात आला हाेता. या संदर्भात खासदार सुनील मेंढे यांनी एनएचएआय साेबत सातत्याने पत्रव्यवहार करुन ना. नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली हाेती. त्यामुळेच या रस्त्याच्या विस्तारीकरणाबाबत डीपीआर विचाराधीन आहे. मंजुरी मिळताच या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

 

Web Title: Expansion of Bhandara-Tumsar-Balaghat road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.