पान टपऱ्यांवर सुरू आहेत एक्झिट पोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:31 AM2021-01-18T04:31:55+5:302021-01-18T04:31:55+5:30

मोहाडी: ग्रामपंचायत मतदानाची टक्केवारी समोर ठेवून तालुक्यात पान टपऱ्यांवर, पारावर मतदारांचे दोन दिवसांपासून एक्झिट पोल सुरू आहेत. ...

Exit polls are running at home | पान टपऱ्यांवर सुरू आहेत एक्झिट पोल

पान टपऱ्यांवर सुरू आहेत एक्झिट पोल

Next

मोहाडी: ग्रामपंचायत मतदानाची टक्केवारी समोर ठेवून तालुक्यात पान टपऱ्यांवर, पारावर मतदारांचे दोन दिवसांपासून एक्झिट पोल सुरू आहेत. उद्या काही तासावर एक्झिट पोलचे चित्र स्पष्ट होईल. कमी-जास्त मतदानानुसार आकडेमोड करत कार्यकर्ते एक्झिट पोल व्यक्त करत आहेत. अंदाजातून पैजाही लागत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा एक्झिट पोल घरात, पारावर, पान पटरी व बारच्या टेबलावर ठरत आहेत.

ग्रामपंचायत मतदानाची टक्केवारी समोर ठेवून तालुक्यात ‘अंदाज अपना अपना’ सुरू झाला आहे. कमी-जास्त मतदानानुसार आकडेमोड करत कार्यकर्ते एक्झिट पोल व्यक्त करत आहेत. अंदाजातून मोठ्या पैजाही लागत आहेत.

सोमवारी दहा वाजता निकाल लागणार असल्याने, ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील पुढाऱ्यांनी आपले देव पाण्यात टाकले आहेत. मोहाडी तालुक्यात ८८.९१ टक्के मतदान झाले. मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडतो, ते दिसणार आहे

तालुक्यातील १७ एकही ग्रामपंचायती बिनविरोध आल्या नाहीत.(??) कोणीही निवडून येवो, गुलाल आम्ही उधळू, असे मतदारांनी सांगतले आहे.

तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतींचा निकाल आल्यावर आपल्या पक्षाचा सरपंच कसा बनेल, याची रणनीती तालुक्यातील सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते आखत आहेत. याबाबतीत जर तरची समीकरणे मांडत आहेत.

१४१ उमेदवारांसाठी ११ हजार ४०५ पुरुषांनी तर १० हजार १२१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले असून, या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे. विक्रमी मतदानाने उमेदवारांची होतेय टिकटिक डोक्यात होत॑ आहे. ह्रदयात धडधड होत आहे. पॅनलप्रमुखांची धाकधूक वाढली आहे. ही धडधड सोमवारी मतमोजणी झाल्यावरच थांबणार आहे.(??)

(नोट- कृपया बातमी पुन्हा एकदा पाहणे. वाक्यांचा ताळमेळ लागत नाहीये. वाक्ये बोल्ड केली आहेत.)

Web Title: Exit polls are running at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.