जिल्ह्यातील ३४ पैकी २४ महसूल मंडलांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST2021-07-10T05:00:00+5:302021-07-10T05:00:40+5:30
जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत जाेरदार पाऊस बरसला. या पावसाचा फटका अनेक घरांना बसला. माेहाडी तालुक्यातील नऊ घरांचे अंशत: नुकसान झाले. त्यात माेहाडी येथील तीन, कान्हळगाव दाेन, वरठी दाेन व करडी येथील दाेन घरांचा समावेश आहे, तर चार घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, माेहाडी, आंधळगाव, वरठी आणि करडी येथील प्रत्येकी एका घराचा समावेश आहे, तर पारडी येथे वीज काेसळून दाेन म्हैशी ठार झाल्या.

जिल्ह्यातील ३४ पैकी २४ महसूल मंडलांत अतिवृष्टी
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दहा दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस काेसळला असून, जिल्ह्यातील ३४ पैकी २४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नाेंद घेण्यात आली आहे. या पावसाने चार घरांचे पूर्णत:, तर ४८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. गत २४ तासांत ९४.१ मिमी पावसाची नाेंद झाली असून, सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात १६८.२ मिमी नाेंदविण्यात आला आहे. या पावसाने खाेळंबलेल्या पेरणीच्या कामाला वेग आला असून, शुक्रवारी शेत शिवारात पेरणीची लगबग दिसत हाेती.
जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत जाेरदार पाऊस बरसला. या पावसाचा फटका अनेक घरांना बसला. माेहाडी तालुक्यातील नऊ घरांचे अंशत: नुकसान झाले. त्यात माेहाडी येथील तीन, कान्हळगाव दाेन, वरठी दाेन व करडी येथील दाेन घरांचा समावेश आहे, तर चार घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, माेहाडी, आंधळगाव, वरठी आणि करडी येथील प्रत्येकी एका घराचा समावेश आहे, तर पारडी येथे वीज काेसळून दाेन म्हैशी ठार झाल्या. साकाेली तालुक्यातील आमगाव बूज येथील नूरइस्माईल दुधकनाेज यांच्या घरातील विजेमुळे ५५ हजार रुपयांच्या इलेक्ट्राॅनिक साहित्याचे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील लाखनी, किन्ही, साेनेखारी येथे प्रत्येकी एका घराचे, तर लाखांदूर येथील ३६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एका गाेठ्याचीही पडझड झाली आहे. भंडारा, पवनी आणि तुमसर तालुक्यात नुकसानीची माहिती नाही.
संततधार काेसळलेल्या या पावसाने भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नाेंद करण्यात आली. पाच तालुक्यांतील ३४ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. माेहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर व लाखनी या तालुक्यांत अतिवृष्टीची नाेंद घेण्यात आली. गत २४ तासांत भंडारा तालुक्यात ५१.३ मिमी, माेहाडी १००.५ मिमी, तुमसर ८४ मिमी, पवनी ९०.२ मिमी, साकाेली ५६.२ मिमी, लाखांदूर १०८ मिमी आणि सर्वाधिक लाखनी तालुक्यात १६८.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१३ मिमी पावसाची नाेंद झाली असून, ती आतापर्यंत काेसळणाऱ्या पावसाच्या सरासरी १२८ टक्के आहे.
शेतशिवारात पेरणीची लगबग
- पावसाअभावी खाेळंबलेल्या पेरणीला गुरुवारी झालेल्या पावसाने गती आली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस काेसळल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. शुक्रवारी शेतशिवारात मजुरांची लगबग दिसत हाेती. विशेष म्हणजे शुक्रवारी ऊन पडल्याने पेरणीच्या कामाला वेग आला हाेता. सर्वत्र पेरणी सुरू असल्याचे चित्र दिसत हाेते. तसेच या पावसाने नदी-नाले खळखळून वाहायला लागले आहेत.