शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

निवडणूक काळात शिक्षण सेवा संवर्गातील प्राचार्य व अधिव्याख्यातांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 2:51 PM

अंगणवाडी ते उच्च माध्यमिक वर्गांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करणाऱ्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्यात्यांची विभागीय परीक्षा ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच होत आहे.

ठळक मुद्देअनेकांची भंबेरीएमपीएससी घेणार ३० व ३१ मार्चला मुंबईत परीक्षा

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगणवाडी ते उच्च माध्यमिक वर्गांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करणाऱ्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्यात्यांची विभागीय परीक्षा ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही परीक्षा ३० व ३१ मार्च रोजी आयोजित केली आहे. अनेक जण निवडणुकीच्या कामात नियुक्त झाल्याने त्यांची भंबेरी उडत आहे.महाराष्ट्र शिक्षण सेवा ( शिक्षण सक्षमीकरण) या संवर्गातील प्राचार्य (गट-अ), ज्येष्ठ अधिव्याख्याता (गट-अ) आणि अधिव्याख्याता (गट-ब) या पदांसाठी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे आदेश संबंधीतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्गमित केले आहे. परीक्षा केंद्र मुंबई येथे आहे. मार्च महिना तसाही अत्यंत महत्वाचा आणि धावपळीचा असतो. आर्थिक लेखाजोख्यांची कामे करण्यात सर्व कार्यालय व्यस्त असतात. ३० व ३१ मार्च हे दोन दिवस तर अटीतटीचे असतात. अशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही परीक्षा नेमकी याच दोन दिवशी मुंबईत आयोजित केली आहे. भरीस भर म्हणजे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वर्ग-१ चे अधिकारी प्रभारी प्राचार्य म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यामुळे कार्यालय प्रमुख म्हणून या कालावधीत कार्यालय कसे सोडावे, असा प्रश्न आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाचे टप्पे सुरू आहे. त्यात सुद्धा झोलन आॅफिसर तथा मतदान केंद्राध्यक्ष अशा जबाबदाºया अनेकांकडे आले आहे. निवडणूक प्रशिक्षणाचा विचार करतार पुढील प्रशिक्षण २८ ते ३० मार्चच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. संपूर्ण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हे सर्व अधिकारी विविध प्रशिक्षणात गुंतले आहेत. आता निवडणुकीचे प्रशिक्षण आणि आर्थिक लेखाजोखाचे काम समोर असताना परीक्षा द्यायची कशी, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या परीक्षेसंदर्भात काही अधिव्याख्याता मॅटमध्ये गेले आहेत. त्याचा सूर म्हणून तर आयोगाने अधिकाऱ्यांना कोंबीत पकडले नाही ना अशी शंकाही अनेकजण व्यक्त करीत आहे. आयोगाला परीक्षेसाठी हीच तारीख का मिळाली, असा संतप्त सवाल केला जात आहे.३२४ पात्र परीक्षार्थ्यांची यादीमहाराष्ट्र शिक्षण सेवा संवर्गातील प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता आणि अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणाºया विभागीय परीक्षेसाठी ३२४ जणांची यादी तयारी करण्यात आली आहे. त्यात प्राचार्य संवर्गातील १५ जणांचा समावेश आहे. तर ३०९ ज्येष्ठ अधिव्याख्याता आणि अधिव्याख्याता ही परीक्षा देणार आहे. यासाठी एमपीएससीने संपूर्ण तयारी केली आहे. मात्र निवडणूक काळात आलेल्या या परीक्षेने अनेकांची भंबेरी उडत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र