माजी विद्यार्थ्यांनी केले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:21 IST2019-09-02T00:20:17+5:302019-09-02T00:21:01+5:30
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत पाडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी असलेल्या भरण समतल नसल्याने याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विटा मातीचे भरण समतल करून शाळेचे पटांगणाला सुंदर स्वरुप प्राप्त करून दिले.

माजी विद्यार्थ्यांनी केले श्रमदान
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : तालुक्यातील धानोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत पाडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी असलेल्या भरण समतल नसल्याने याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विटा मातीचे भरण समतल करून शाळेचे पटांगणाला सुंदर स्वरुप प्राप्त करून दिले. माजी विद्यार्थ्यांच्या या श्रमदानाची गावात स्तुती होत आहे.
धानोरी येथे जि.प. उच्च शाळेची जीर्ण झालेली कौलारू इमारत पाडण्यात आली होती. या शाळेचे बांधकाम १९६२ मध्ये करण्यात आले होते. बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार सदर इमारत निर्लेखीत करण्यात आली होती. शाळेच्या पटांगणासमोर खोलगट भागात विटा मातीचे भरण घालण्यात आले होते. मात्र सदर भाग समतल नव्हता. या संदर्भात मुख्याध्यापिका प्रतिभा पारधी यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत याच शाळेचे माजी विद्यार्थी पोळ्याच्या सुटीनिमित्त एकत्र आले. हातात कुदळ, फावडे घेऊन शाळेचे पटांगण समतल करायला सुरुवात केली. अवघ्या दोन तासांच्या श्रमदानाने चिमुकल्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पटांगण समतल करून दिले. यात माजी विद्यार्थ्यांमध्ये करण बारसागडे, अभिषेक नागपुरे, गणेश नान्हे, लखन वाघधरे, रोहित दिघोरे, अजित मनगटे, स्वप्नील पारधी, आदित्य मेश्राम, क्रिश नान्हे, क्रिष्णा दरवरे, रुपेश दरवरे, अक्षय मंडपे, संकेत शिंदे, मंगेश मंडपे, मयूर भुते, शुभम पारधी, स्वप्नील भोयर, नरेश जुमडे तसेच सरपंच नामदेव वाघधरे यांचा समावेश होता. शिक्षक तथा ग्रामस्थांनी या सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.