पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ई.व्ही.एम.ची तपासणी
By Admin | Updated: September 17, 2014 23:35 IST2014-09-17T23:35:10+5:302014-09-17T23:35:10+5:30
जिल्हयामध्ये दाखल झालेल्या ई.व्ही.एम. पैकी कोणत्या मतदार संघामध्ये कोणती ई.व्ही.एम. मशीन जाणार यासाठीचे संगणकीय पध्दतीने सरमिसळ आज करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील

पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ई.व्ही.एम.ची तपासणी
भंडारा : जिल्हयामध्ये दाखल झालेल्या ई.व्ही.एम. पैकी कोणत्या मतदार संघामध्ये कोणती ई.व्ही.एम. मशीन जाणार यासाठीचे संगणकीय पध्दतीने सरमिसळ आज करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात राजकिय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष बॅलेट व कंट्रोल युनीटचे सरमिसळीकरण पार पाडले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिलिंद बनसोड, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, भंडाराचे उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तुमसरचे उपविभागीय अधिकारी अशोक लटारे, साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, जिल्हा सूचना अधिकारी संदीप लोखंडे उपस्थित होते.
संदीप लोखंडे यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना संगणकीय पध्दतीची सरमिसळ याबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर प्रत्यक्ष संगणकीय सरमिसळ करण्यात आली.
यावेळी भंडारा, तुमसर, साकोली यातिनही विधानसभा क्षेत्रात देण्यात येणा-या ई.व्ही.एम. ची या संगणकीय सरमिसळ केल्याची छापील प्रत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. सरमिसळ केल्यानंतरच्या यादीप्रमाणे ई.व्ही.एम. मतदार संघ निहाय्य वर्गीकरण करण्यात येईल. यानुसार राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना देण्यात आलेल्या छापील यादीनुसार कधीही एखाद्या मतदारसंघामध्ये त्याच प्रकारची मशीन देण्यात आली किंवा नाही, याची खात्री करु शकतील. यानंतर दुसरे संगणकीय सरमिसळ करण्यात येईल. यामध्ये मतदान केंद्रनिहाय ई.व्हि.एम. ची यादी करण्यात येईल. (प्रतिनिधी)