जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकजन ग्राहकच
By Admin | Updated: March 16, 2017 00:30 IST2017-03-16T00:30:17+5:302017-03-16T00:30:17+5:30
जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकजन हा ग्राहकच असतो. म्हणून वस्तु खरेदी कतांना वस्तु चांगल्या दजार्ची आहे काय,....

जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकजन ग्राहकच
मनोहर चिलबुले : जागतिक ग्राहक दिन उत्साहात
भंडारा : जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकजन हा ग्राहकच असतो. म्हणून वस्तु खरेदी कतांना वस्तु चांगल्या दजार्ची आहे काय, गॉरंटी आहे काय, याकडे ग्राहकांचा कल असावा. तो वरील निकषावर खरा निघाला नाही तर तात्काळ ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे अर्ज दाखल करावा, असे प्रतिपादन ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष मनोहर चिलबुले यांनी केले.
जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम सामाजिक न्यायभवन येथे साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे होते. पाहुणे म्हणून तहसिलदार संजय पवार, पणन अधिकारी पोहनकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी संजय रामटेके उपस्थ?ित होते.
यावेळी मनोहर चिलबुले म्हणाले, ग्राहक संरक्षण कायदयात वस्तु बदलून देण्याची तरतूद आहे. तसेच ग्राहकांना नुकसान भरपाई सुध्दा देण्यात येते. वाहनाची चोरी झाल्यास तात्काळ सबंधित संस्थेला कळवायला पाहिजे. ४८ तासात सदर दावा न केल्यास कंपनी विमाधारकाचा दावा विमा कंपनी खारीज करु शकते. तसेच पॉलीसी वरील अटी व शर्ती ग्राहकांनी पहावयास हव्या व अटी व शर्ती मंजूर नसल्यास १५ दिवसात पॉलीसी परत कराव्या. त्यामुळे फसगत होणार नाही. अनकेदा लोभापायी फसगत होण्याची शक्यता असते म्हणून ग्राहकांनी लोभीपणा सोडावा व सतर्कता बाळगावी. पक्क्या बिलाचा आग्रह धरावा. एखादी घटना घडल्यानंतर दोन वर्षाच्या आत ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल करावा, असेही त्यांनी सांगितले.
तहसीलदार संजय पवार म्हणाले, ग्राहक चळवळ ज्या प्रमाणे दिसायला पाहिजे त्याप्रमाणे तीची वाटचाल दिसत नाही. त्यामुळे ग्राहकांची फसगत होत आहे. म्हणून आपले हक्क खरेदी करतांना बघावे. आपली पिळवणूक होऊ नये याकडे बघावे. आपले अधिकार व कर्तव्याची जाणीव ठेवावी. रमेश बेंडे यांनी ग्राहक चळवळीच्या इतिहासाची जाणीव करुन देतांना ग्राहकांचे सात अधिकार व सात कर्तव्य या विषयी माहिती दिली. नागरिकात सुज्ञता व जागरुकता असली पाहिजे. तसेच आपले अधिकार व कर्तव्याची जाणीव असली पाहीजे, असेही ते म्हणाले.
(शहर प्रतिनिधी)