अखेर तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु

By admin | Published: May 18, 2017 12:33 AM2017-05-18T00:33:47+5:302017-05-18T00:33:47+5:30

तालुक्यातील गर्रा येथे दुसरे तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु व्हावे या मागणीला घेऊन बुधवारी शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले.

Eventually the Leopard Collection Center started | अखेर तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु

अखेर तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु

Next

गर्रा येथील प्रकार : राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील गर्रा येथे दुसरे तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु व्हावे या मागणीला घेऊन बुधवारी शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. याचे फलीत म्हणजे तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु झाले.
माहितीनुसार, तालुक्यातील गर्रा बघेडा फाट्यावर दुसरे तेंदूपत्ता संकलन सुरु करावे अशी मागणी शिवसेनेने केली होती. मागणीची पूर्तता न झाल्याने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांच्या उपस्थितीत बघेडा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रणरणत्या उन्हातही शिवसैनिकांनी रास्ता रोको करून प्रशासनाला मागणी पूर्ण करण्यासाठी बाध्य केले. यावेळी तहसीलदार गजेंद्र बालपांडे, नायब तहसीलदार गौंड, वनविभागाचे अधिकारी कोडापे, पोलीस निरीक्षक राजेंद्र नागरे आंदोलनस्थळी उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, नरेश उचिबगले, प्रकाश लहसुनेते, अमित मेश्राम, मनोज चौबे, प्रकाश पारधी, नरेश टेंभरे, प्रकाश चौधरी, जोगेश कटरे आदी शिवसैनिक उपस्थित होते. सदर तेंदूपत्ता संकलन सुरु झाल्याने परिसरातील कुटुंबांना दूरपर्यंत जाण्याची कटकट वाचणार आहे.

Web Title: Eventually the Leopard Collection Center started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.