काेराेना संकटातही गुरुजींची विद्यार्थी प्रवेशासाठी ग्रामीण भागात शाेधमाेहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST2021-05-21T04:37:53+5:302021-05-21T04:37:53+5:30
काेराेना महामारीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढल्या वर्गात प्रवेश देण्यात आला. यावर्षी वर्ग एक ते आठच्या सर्व विद्यार्थ्यांना आरटी ...

काेराेना संकटातही गुरुजींची विद्यार्थी प्रवेशासाठी ग्रामीण भागात शाेधमाेहीम
काेराेना महामारीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढल्या वर्गात प्रवेश देण्यात आला. यावर्षी वर्ग एक ते आठच्या सर्व विद्यार्थ्यांना आरटी ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गाेन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. काेराेनाच्या सावटात हेही सत्र संपले. नव्या सत्राला प्रारंभ हाेणार आहे. नवीन वर्गात प्रवेश भरतीसाठी दरवर्षीप्रमाणेच गुरुजींची धावपळ सुरू झालेली आहे.
मात्र, अनेक जिल्हा परिषद शाळांचा निकाल तयार व्हायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून टीसी मिळत आहे. त्या गावामध्ये शिक्षक दाखल हाेत आहे. विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत प्रवेश घेण्यासाठी विविध प्रलाेभन दिले जात आहे. आमची शाळा किती चांगली आहे हे पालकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षकांमध्येही स्पर्धा पहावयास मिळत आहे. विशेषत: खासगी शाळांतील शिक्षकांमध्ये ही स्पर्धा अधिक तीव्र स्वरुपाची असते.
खासगी शाळांची संख्या जास्त व विद्यार्थ्यांची संख्या कमी अशी स्थिती आहे. शासनमान्य तुकडी तुटून शिक्षक अतिरिक्त हाेण्याची भीती असते तसेच नवीन शाळा अनुदानाच्या टप्यावर आलेल्या आहेत. त्यांनाही विद्यार्थ्यांची गरज असते. त्यामुळे संस्थाचालक शिक्षकांवर दबाव आणत आहे. काेराेना संकटात शिक्षक गावागावांत भटकंती करत आहेत.
पालक व विद्यार्थ्यांना प्रलाेभन
शाळेत प्रवेशासाठी शिक्षक पालक व विद्यार्थ्यांना प्रलाेभन देत आहे. वह्या-पुस्तके, गणवेश यासह सायकल देण्याचेही आमिष दिले जात आहे. हा सर्व खर्च शिक्षकांना आपल्या खिशांतून करावा लागणार हे तेवढेच खरे आहे. विद्यार्थीसंख्या कमी असल्याने शिक्षकांना पदरमाेड केल्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही.