सात दशकांनंतरही रस्ता चिखलाने माखलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:01:05+5:30

कर्कापूर ते सीलेगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. सध्या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. दोन गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असला तरी दुरूस्तीचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. सध्या शेती कामाचा हंगाम असून शेती अवजारे व खते शेतात कसे घेवून जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Even after seven decades, the road is muddy | सात दशकांनंतरही रस्ता चिखलाने माखलेला

सात दशकांनंतरही रस्ता चिखलाने माखलेला

ठळक मुद्देकर्कापूर-सीलेगाव रस्ता : रस्ता बांधकामासाठी २१ जुलैपासून उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही तालुक्यातील कर्कापूर-सीलेगाव रस्ता चिखलाने माखलेला आहे. गावकरी आणि शेतकऱ्यांना चिखल तुडवत रस्ता पार करावा लागत आहे. अद्यापपर्यंत या रस्त्याची दुरूस्ती न झाल्याने प्रशासनाविरूद्ध रोष असून आता समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी २१ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
कर्कापूर ते सीलेगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. सध्या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. दोन गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असला तरी दुरूस्तीचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. सध्या शेती कामाचा हंगाम असून शेती अवजारे व खते शेतात कसे घेवून जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याप्रकरणी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत त्याचा काहीच फायदा झाला नाही. दोनही गावातील नागरिकात सध्या प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही निवेदन देण्यात आले. त्यांनीही लक्ष दिले नाही. कर्कापूरचे सरपंच प्रल्हाद आगाशे, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे, अभय मिश्रा यांनी ही समस्या बांधकाम विभागाकडे मांडली होती. परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. आता २१ जुलैपासून उपोषणावर गावकरी ठाम आहेत.

Web Title: Even after seven decades, the road is muddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.