गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:56+5:30
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने अटी व शर्तीच्या अधिन राहून गणपतीची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. मंडळांनाही अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. गणेशपुरचा राजा, भंडाराचा राजा यासह विविध मंडळांनी प्रशासनाला पूरक भूमिका घेत यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची स्थापना करण्यात आली.

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाची स्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दरवर्षीचा उत्साह, जोश आणि ढोलताशांचा कडकडाट नसला तरी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात लाडक्या गणरायाची स्थापना गणेशभक्तांनी अगदी साधेपणात केली. जिल्ह्यात १३४ सार्वजनिक मंडळांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अटी व शर्तीचे पालन करीत गणरायाची स्थापना केली. तर १०६ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविला जात आहे. कोरोना संसर्गाची भीती असली तरी भक्तांच्या उत्साहात मात्र कुठेही कमी दिसत नव्हती. विघ्नहर्त्याने कोरोनाचे विघ्न नष्ट करावे अशी मनोमन प्रार्थना करीत गणपती बाप्पाला अनेकांनी आपल्या घरी स्थापन केले.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने अटी व शर्तीच्या अधिन राहून गणपतीची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. मंडळांनाही अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. गणेशपुरचा राजा, भंडाराचा राजा यासह विविध मंडळांनी प्रशासनाला पूरक भूमिका घेत यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची स्थापना करण्यात आली. भंडारा शहरासह साकोली, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखनी, लाखांदूर तालुक्यातही उत्साहात गणेशाची स्थापना झाली आहे. यावर्षी कोरोना संसर्गामुळे १३४ सार्वजनिक मंडळांनी गणरायाची स्थापना केल्याची माहिती आहे. तर एक गाव एक गणपती उपक्रमाला १०६ गावांनी प्रतिसाद दिला.
भंडारा भंडारा शहरासह साकोली, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखनी, लाखांदूर तालुक्यातही उत्साहात गणेशाची स्थापना झाली आहे. भंडारा शहरातील गांधी चौक, बडा बाजार, दसरा मैदान आणि मूर्तीकारांच्या घरी गणरायाला आपल्या घरी नेण्यासाठी भाविकांची वर्दळ सकाळपासून दिसत होती. यासोबतच शहरातील चौकाचौकात फुल हार, पूजेचे साहित्य विक्रेत्यांची दुकानेही मोठ्या प्रमाणात थाटली होती. फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवित मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु होती.