शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

कृषीवर आधारित उद्योग उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

भंडारा तालुक्यातील बेला येथे पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्यावतीने तालुकास्तरीय पशुपक्षी व कृषी प्रदर्शन तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटक म्हणून आमदार भोंडेकर बोलत होते.

ठळक मुद्देनरेंद्र भोंडेकर : भंडारा तालुकास्तरीय पशुपक्षी व कृषी प्रदर्शन तथा शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : युवकांनी नोकरीच्या मागे न लागता पशुसंवर्धन व कृषीवर आधारित गटांच्या माध्यमातून उद्योगधंदे उभारणे गरजेचे आहे. यातूनच आर्थिक सुबत्ता साधावी. अडचणी आल्यास आपण सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली.
भंडारा तालुक्यातील बेला येथे पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्यावतीने तालुकास्तरीय पशुपक्षी व कृषी प्रदर्शन तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटक म्हणून आमदार भोंडेकर बोलत होते.
यावेळी मंचावर कृषी व पशुसंवर्धन सभापती विवेकानंद कुर्झेकर, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, निलकंठ कायते, चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती भंडाराच्या उपसभापती वर्षा साकुरे, सरपंच पुजा ठवकर, उपसरपंच मंगला पुळके, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुरेश कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके, कृषी विकास अधिकारी आर. आर. डोंगरे, गटविकास अधिकारी नुतन सावंत उपस्थित होते.
भंडारा तालुक्यातून आलेल्या विविध गटातील पाळीव प्राण्यांच्या प्रदर्शनीची व विविध पशुसंवर्धन व कृषी व स्वयंसहाय्यता गटांच्या स्टॉलची मान्यवरांनी पाहणी करुन माहिती जाणून घेतली. यावेळी जया सोनकुसरे यांनी या भागातील पशुपालकांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी पशुसंवर्धन व कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा सहायाने कृषीपुरक उद्योगधंदे उभारून आर्थिक समृध्दी साधावी, असे सांगितले. निलकंठ कायते, चंद्रप्रकाश दुरुगकर व सरपंच पुजा ठवकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. नितीन फुके यांनी प्रास्ताविकात मागील दोन वर्षात पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना मंजूर करुन अंमलबजावणी करुन राबविल्याचे सांगून विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचलन रमेश खोब्रागडे यांनी केले.
आभार कृषी अधिकारी चौधरी यांनी मानले. प्रदर्शनाचे आयोजन पंचायत समिती भंडाराच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. सविता चोले यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रशांत वैद्य, डॉ. विठ्ठल हटवार, डॉ. प्रिती श्रावणकर, डॉ. राणू कडू, डॉ. सुरज पाटील, डॉ. दिपक मदिकुंठावर, प्रमोद सपाटे, रामकृष्ण निखारे, प्रविण टेंभुर्णे, प्रविण वैद्य, माधव मानकर, विशाल भडके यांनी प्रदर्शनीच्या आयोजनाकरीता सहकार्य केले. प्रदर्शनीचा लाभ घेण्यासाठी परिसरातील शेतकरी, पशुपालक उपस्थित होते.