उत्साहाला वय नसते ; शिवजयंतीनिमित्त ज्येष्ठांची रंगली कबड्डी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 14:40 IST2019-02-20T14:39:29+5:302019-02-20T14:40:13+5:30
उत्साहाच्या आड वय कधीच येत नसते याची प्रचिती जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत मंगळवारी उपस्थितांना आली.

(छाया - मुखरु बागडे-पालांदूर)
ठळक मुद्देउत्स्फूर्तपणे घेतला सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: उत्साहाच्या आड वय कधीच येत नसते याची प्रचिती जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत मंगळवारी उपस्थितांना आली.
शिवजयंतीनिमित्त लाखनी तालुक्यातील मरेगाव येथे कबड्डीची स्पर्धा आयोजित होती. तरुण कबड्डीचे डाव टाकत होते. कधीकाळी याच मातीत कबड्डीचा डाव टाकलेल्या ज्येष्ठांनाही राहावले नाही आणि या वयातही त्यांनी कबड्डी - कबड्डी म्हणत खेळात भाग घेतला. ज्येष्ठांच्या अंगातील स्फूर्ती तरुणांनाही लाजविणारी होती. त्यांचा खेळ पाहण्यासाठी मग गावकरीही हातातील कामांना घटकाभर विसावा देऊन सरसावून बसले.