महिलांवरील अत्याचार संपता संपेना !

By Admin | Updated: November 25, 2015 03:05 IST2015-11-25T03:05:07+5:302015-11-25T03:05:07+5:30

वेळ सायंकाळी ७.४५ वाजताची. (शनिवार) जिल्हा मुख्यालयातील कंट्रोल रुममधील १०९१ हा हेल्पलाईन क्रमांकावर

Ending atrocities against women! | महिलांवरील अत्याचार संपता संपेना !

महिलांवरील अत्याचार संपता संपेना !

आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार विरोधी दिन आज : १० टक्के कॉल्स निघतात निनावी, दोन पथक रात्रंदिवस असतात तैनात
भंडारा : वेळ सायंकाळी ७.४५ वाजताची. (शनिवार) जिल्हा मुख्यालयातील कंट्रोल रुममधील १०९१ हा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. कर्तव्यावर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्याच रिंगमध्ये फोन उचलून प्रतिसाद दिला. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात एका महिलेला मारहाण होत असल्याची बाब कळविण्यात आली. क्षणात याची नोंद संबंधित कर्मचाऱ्याने घेऊन याची माहिती महिला अत्याचार विरोधी पथकाला देण्याचे सांगितले. फोन सुरु असतानाच इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीच्या माध्यमातून वायरलेसवर सूचना देण्याचा प्रयत्न करीत असतानाच सदर घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा पोलीस प्रशासन महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जागृत व तेवढेच गंभीर आहे का? याची चाचपणी या घटनेवरून उघडकीला आली. त्यानंतर लोकमत चमुने अशी घटना घडली नसून पोलीस विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर एखाद्या घटनेची तात्काळ नोंद करून दखल घेण्यात येते का? याची शहानिशा करीत असल्याचे स्पष्ट केले.
२५ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने ‘स्टींग आॅपरेशन’ केले. यात महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. त्यात ही बाब अधोरखित झाली. जिल्हा पातळीवर पोलीस दल महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत दक्ष असल्याचे दिसून आले.
कॉल केल्यावर मिळतो प्रतिसाद
एखाद्या महिलेवर अत्याचार संबंधीची माहिती कळताच याची माहिती महिला अत्याचार विरोधी पथकाला दिली जाते. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकारी मुख्य असून त्यांच्या निगराणीत सहा कर्मचारी घटनास्थळी जाण्यासाठी नेहमी तैनात असतात. सद्यस्थितीत सहायक पोलीस निरीक्षक ललिता ताडसे या महिला सेलच्या पथकाच्या प्रमुख आहेत.
यावर्षी सन २०१५ मध्ये २८ प्रकरणे खरी निघाली असल्याचे सांगून १०० पैकी ९० घटना सत्य असल्याचे तर १० टक्के घटना बनावटी असल्याची बाब सदर पथकाने स्पष्ट केली. (लोकमत चमू)
भंडाऱ्यात १०३ ऐवजी १०९१ ची सुविधा
४राज्य शासनाने सुरु केलेल्या १०३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यावर कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्याऐवजी भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनाने वर्षभरापूर्वी १०९१ ही हेल्पलाईन सुरु केली. कंट्रोल रुममधून ही हेल्पलाईन सुविधा कार्यान्वित करण्यात येत असून जिल्ह्यातील संकटात असलेली महिला या क्रमांकावर संपर्क साधून मदत घेऊ शकते. १०९१ हा क्रमांक सरळ डायल करून पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधता येतो. १०३ ऐवजी १०९१ ची सुविधा जिल्ह्यात कार्यान्वित असल्याची बाब बहुतांश जणांना माहित आहे. या आशयाचा प्रसार व प्रचार प्रशासनाने केला आहे.
१० महिन्यात अत्याचाराची २३० प्रकरणे
४जिल्हा पोलीस प्रशासनातील महिला आपादग्रस्त केंद्रात जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्यात महिला अत्याचाराची २३० प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. मागीलवर्षी २१४ प्रकरणे दाखल करण्यात आली होती. मागील १० महिन्यापैकी जानेवारीमध्ये १६, फेब्रुवारी १९, मार्च १५, एप्रिल २१, मे २५, जून २४, जुलै २५, आॅगस्ट १७, सप्टेंबर ८ तर आॅक्टोबर महिन्यात ५ प्रकरणे मार्गी लावण्यात आली आहेत. याची एकुण संख्या १७५ इतकी आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या सात घटना अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी सोपविण्यात आली आहेत. १४ प्रकरणे न्यायालयाच्या निर्णयार्थ आहेत.

Web Title: Ending atrocities against women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.