दवडीपार येथे भागवत सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:35 IST2021-02-16T04:35:43+5:302021-02-16T04:35:43+5:30
भंडारा.. जय हनुमान भागवत सप्ताह समिती व ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यामाने दवडीपार (बा.) येथे हनुमान मंदिर क्षेत्रात भागवत ...

दवडीपार येथे भागवत सप्ताहाचा समारोप
भंडारा.. जय हनुमान भागवत सप्ताह समिती व ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यामाने दवडीपार (बा.) येथे हनुमान मंदिर क्षेत्रात भागवत समारोह कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील मेंढे, प्रशांत खोब्रागडे, रामलाल चौधरी ,नीलकंठ कायते, पं. स.सदस्य प्रमिला लांजेवार, सरपंच अश्विनी मडावी, भागवत हजारे, विलास भांडारकर, ज्योती टेंबुर्ने, दयानंद नाखाते ,अविनाश थोंडे, प्रशांत चकोले, विनोद बान्ते, संजय लांजेवार,भिसे पेंटर ,मंगेश थोटे, निरंजन कानतोडे, हभप चक्रधर रेहपाडे महाराज, गंगाधर सावरकर, नितीन वाडीभस्मे, हिरा महाराज, पोलीस पाटील प्रफुल धुर्वे व ग्रामवासी उपस्थित होते. खासदार सुनील मेंढे यांनी मार्गदर्शन केले. रामलाल चौधरी, प्रशांत खोब्रागडे, प्रसन्न चकोले, गोपाल भिसे यांनी गावकऱ्यांना धार्मिकतेचे महत्त्व पटवून दिले. गोपाल भिसे सामाजिक कार्यकर्ते यांचेतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन साहित्य वाटप केले. भागवत सप्ताह कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी महाप्रसाद देण्यात आला. संजय मडावी यांनी सर्वांचे आभार मानले. भागवत सप्ताह कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामवासीयांनी सहकार्य केले.