आश्वासनाअखेर उपोषणाची सांगता

By Admin | Updated: October 31, 2015 01:42 IST2015-10-31T01:42:05+5:302015-10-31T01:42:05+5:30

परवानाधारक सावकाराने ज्या शेतकऱ्यांना नमुना ८ ची पावती दिली. परंतु त्यांचे नाव कर्ज खतावणीमध्ये घेतले नाही, ...

The end of the affirmation of fasting | आश्वासनाअखेर उपोषणाची सांगता

आश्वासनाअखेर उपोषणाची सांगता

कारवाईचे आदेश : रामचंद्र अवसरे यांचा पुढाकार
भंडारा : परवानाधारक सावकाराने ज्या शेतकऱ्यांना नमुना ८ ची पावती दिली. परंतु त्यांचे नाव कर्ज खतावणीमध्ये घेतले नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच संबंधित सावकाराचा परवाना रद्द करण्यात येईल, असे आश्वासन आमदार रामचंद्र अवसरे यांनी उपोषकर्त्या शेतकऱ्यांना आज, शुक्रवारी दिले. त्यानंतर उपोषणाची रितसर सांगता करण्यात आली.
लाखांदूर तालुक्यातील सावकारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले नाही, अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा, शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून सावकारांविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन सावकारी कर्जमुक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात गुरुवारपासून आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. जिल्हा उपनिबंधकांनी शिष्टमंडळाला पाचारण करून त्यांना मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. छबीलाल भरणे या परवानाधारक सावकाराने ज्या शेतकरी कर्जदारांना ८ नंबरची पावती दिलेली आहे परंतु त्यांचे नाव सावकाराच्या खतावणीत घेतली नाही असे शेतकरी शासनाने घोषित केलेल्या सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहू नये याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे, असे आश्वासन जिल्हा उपनिबंधकांनी उपोषणकर्त्यांना गुरुवारी दिले होते. मात्र शासनाकडून पत्रव्यवहाराची प्रत मिळणार नाही, तोपर्यत उपोषण सुरुच ठेवण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांचा होता. आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी आज, उपोषणकर्त्याची भेट घेऊन मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सावकारी कर्जमुक्ती संघर्ष समितीचे चंद्रशेखर टेंभुर्णे, भोजराज राऊत, धर्मा रंगारी, गणेश राऊत, देवराम राऊत, वासुदेव तोंडरे, सोनू हटवार, दाजीबा ढोरे, किशोर मेश्राम, धर्मपाल रामटेके, संध्या रंगारी, कुसुम दिवटे, कौशल्या चौधरी, मनोज ढेगरी, शास्त्री खरकाटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The end of the affirmation of fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.