शासकीय भूखंडात अतिक्रमण
By Admin | Updated: July 16, 2014 23:17 IST2014-07-16T23:07:41+5:302014-07-16T23:17:10+5:30
सुनील मोरजकर : वेंगुर्ले पंचायत समिती बैठकीत गौप्यस्फोट

शासकीय भूखंडात अतिक्रमण
वेंगुर्ले : वेंगुर्ले कॅम्प येथे वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालयीन इमारतीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडात अतिक्रमण झाल्याचा वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सुनील मोरजकर यांनी बुधवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गौप्यस्फोट केला. त्यास गटविकास अधिकारी टी. बी. जाधव यांनी दुजोरा दिला.
वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी पंचायत समितीच्या बॅ. नाथ पै सभागृहात सभापती अभिषेक चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती सुनील मोरजकर, गटविकास अधिकारी टी. बी. जाधव, पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम परब, सावरी गावडे, चित्रा कनयाळकर, सुचिता वजराठकर, उमा मठकर, प्रणाली बंगे व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला राष्ट्रीय स्तरावरील राजीव गांधी सशक्तीकरण पुरस्कारप्राप्त परुळे बाजार ग्रामपंचायतीचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप प्रभू यांचा सभापती चमणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच पुरुषोत्तम प्रभू उपस्थित होते. हा पुरस्कार सर्व कर्मचारीवर्ग, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे मिळाला असल्याचे मनोगत प्रदीप प्रभू यांनी व्यक्त केले.
वेंगुर्ले पंचायत समितीच्या कार्यालयासाठी कॅम्प येथे ४० गुंठे भूखंड आरक्षित आहे. या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे उपसभापती मोरजकर यांनी सांगताच त्यास गटविकास अधिकारी टी. बी. जाधव यांनी दुजोरा दिला. या भूखंडासभोवती दगडी कंपाऊंड घालण्यात यावे व अतिक्रमण हटविण्यात यावे असे या बैठकीत ठरले. पंचायत समितीची वेबसाईट तयार करावी व त्यासाठी पंचायत समिती सेस फंडातून खर्च करावा तसेच तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील सातवीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन वर्ग सुरु करावा अशी सूचना सभापती चमणकर यांनी मांडली. तालुक्यातील रिक्त शिक्षकपदे त्वरीत भरण्यात यावीत अशी मागणी सुचिता वजराठकर यांनी केली तर रेडी प्राथमिक आरोग्यकेंद्रात डॉक्टरांची नेमणूक लवकरात लवकर करावी, अशी मागणी चित्रा कनयाळकर यांनी केली. (प्रतिनिध