लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सणासुदीच्या काळात अचानक सुरू झालेल्या भारनियमनाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा जात आहे. जिल्हा भरात १२ ते १५ तासाचे सलग भारनियमन होत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरूद्ध एल्गार पुकारला आहे. धारगाव विभागातील शेतकऱ्यांनी सोमवारी भंडारा येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांना घेराव घातला.जिल्ह्यात गत दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. भाताचे पीक करपत आहे. प्रकल्पाचे पाणी शेतापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संपूर्ण मदार वीज मोटरपंपावर आहे. अनेक शेतकरी नदी, नाल्यावर आणि विहिरींवर मोटरपंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र गत १५ दिवसांपासून अचानक भारनियमनात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात १२ ते १५ तासाचे भारनियमन केले जाते. त्यातच अनेक रोहित्रांवर दाब वाढल्याने शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. त्यामुळे ओलीत करणे शक्य होत नाही. त्यातच रात्रीच्यावेळी वीज पुरवठा होत असल्याने ओलीतासाठी मजुरही मिळत नाही. या सर्व प्रकाराने जिल्हाभरातील शेतकरी त्रस्त झाला आहे.भारनियमनाचा अतिक्ति होत असल्याने भंडारा तालुक्यातील धारगाव विभागातील शेतकऱ्यांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. धारगाव विभागात अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. धारगाव फिडरवर सकाळी ७ ते सायंकाळी ४ आणि सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत भारनियमन केले जाते. याचा फटका शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. अन्यायकारक भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी शेतकरी वीज वितरण कंपनीत धडकले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश हुमणे, उपसरपंच शिवाजी रेहपाडे, गुंथाराचे उपसरपंच दिलीप कायते, प्रशांत गजभिये, जनार्धन निंबार्ते, मुरलीधर वंजारी, रामप्रसाद ईळपाते, उमेश सार्वे, राजू सुर्यवंशी आदींसह शेतकरी उपस्थित होते.कमी दाबाच्या विजेचा फटकाभारनियमनासोबत शेतकऱ्यांना कमी दाबाचा विजेचा फटका सहन करावा लागतो. भंडारा जिल्ह्यातील अनेक रोहित्र ओव्हरलोड झाले आहे. क्षमतेपेक्षा अधिक जोडण्या एका रोहित्रावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाब आणि वीज मिळत नाही. कमी दामामुळे मोटारपंप सुरू होत नाही तर अनेक शेतकºयांचे मोटरपंप जळत असल्याच्या तक्रारी आहेत.डिझेल पंपाचा आवाज घुमू लागलाधान पीक वाचविण्यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करीत आहे. नदी, नाले आणि तलावावर डिझेल पंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतशिवारात सध्या डिझेलपंपाचा आवाज घुमू लागला आहे.
भारनियमनाविरूद्ध एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:25 IST
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सणासुदीच्या काळात अचानक सुरू झालेल्या भारनियमनाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा जात आहे. जिल्हा भरात ...
भारनियमनाविरूद्ध एल्गार
ठळक मुद्देवीज अभियंत्यांना शेतकऱ्यांचा घेराव : १२ ते १५ तासांचे भारनियमन