शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांचा प्रशासनाविरूद्ध एल्गार

By admin | Updated: October 15, 2014 23:16 IST

गर्भात असलेल्या धान पिकांना संजिवनी ठरणारा पाणी मिळावा यासाठी मोहगाव देवी येथील मतदारांनी पेंच प्रकल्पाच्या प्रशासनाविरूद्ध मतदान बहिष्काराचा एल्कार पुकारला परंतु गावकऱ्यांच्या मागण्या

मोहाडी : गर्भात असलेल्या धान पिकांना संजिवनी ठरणारा पाणी मिळावा यासाठी मोहगाव देवी येथील मतदारांनी पेंच प्रकल्पाच्या प्रशासनाविरूद्ध मतदान बहिष्काराचा एल्कार पुकारला परंतु गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने प्रशासना विरूद्ध गाव कऱ्यांच्यामध्ये संताप दिसत होता. या बहिष्कारात गावकऱ्यांच्या प्रत्यक्षपणे विजय झाला, असे प्रशासनाच्या मुजोरीमुळे मोहगावात मतदान तर झाले नाही व मतदानाच्या हत्याराचे वापर कयन पेंच प्रकल्पाचे पाणी मिळेल ही आशा असताना प्रशासनाने गावकऱ्यांना इंगा दाखल्याचे स्पष्ट दिसून आले.पेंच प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अशी सातत्याने मोहगाव देवी येथील शेतकऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी भंडारासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तहसीलदार मोहाडी यांनी सोमवारी ग्रामपंचायतमध्ये येवून प्रशासनातर्फे बहिष्कार मागे घेण्याची विनंती मोहगाव वासियांना केली. पाणी आणून देण्याची स्वत: जबाबदारी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी स्विकारली. पाणी आले, कोरडा नहर ओला झाला. परंतु पुन्हा पाणी बंद झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी एक मिटरचे गेज पाणी देत असाल तर मतदान करू या अटीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरपंच राजेश लेंडे यांच्या वतीने करण्यात आला. पण पेंचचे पाणी न आल्याने मोहगाव देवी येथील मतदारांचा बहिष्कार कायम होता. एका पाण्यासाठी धान पिक डोळ्यापुढे जात असताना पेंच प्रकल्पाचे अभियंता गोडनाले यांनी जाणीवपूर्वक मोहगावदेवी उपवितरीकेला धानाच्या पिकाला पाणी पोहचू दिले नाही. पेंचचा पाणी तात्काळ मिळावा यासाठी सरपंच राजेश लेंडे, ग्यानीराम साखरवाडे, वसंता लांबट, रामा लांजेवार, शरद लांबट, देवराव लेंडे, विनोद बालपांडे आदी गावकऱ्यांनी प्रयत्न केले. पण, प्रशासनाने अखेरपर्यंत मोहगावच्या शेतकऱ्यांना इंगा दाखविला. अखेर बहिष्कारात पूर्ण गावकरी सामिल झाले होते. या बहिष्कारात एकीचे दर्शन बघायला मिळाले. (तालुका/शहर प्रतिनिधी)