वीज अभियंते जाणार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:37 IST2021-08-23T04:37:37+5:302021-08-23T04:37:37+5:30
निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांमध्ये महापारेषण कंपनीतील एकतर्फी लागलेल्या अभियंत्यांचा स्टाफ सेटअप बाबत पूर्ण विचार करणे, महावितरण कंपनीतील आवश्यक रिक्त ...

वीज अभियंते जाणार संपावर
निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांमध्ये महापारेषण कंपनीतील एकतर्फी लागलेल्या अभियंत्यांचा स्टाफ सेटअप बाबत पूर्ण विचार करणे, महावितरण कंपनीतील आवश्यक रिक्त पदे ही संकल्पना रद्द करावी, तिन्ही कंपनीत प्रलंबित असलेले पदोन्नतीबाबत विचार करावा, गत दोन वर्षांपासून कोणत्याही पदाची पदोन्नती झाली नाही त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अभियंत्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे, महानिर्मिती कंपनीतील एकतर्फी बदली धोरण व फॅक्टरी अलाउन्स लागू न करावी, कंपनीमध्ये संघटनांना विश्वासात न घेता नोटीस ऑफ चेंज न देता प्रशासनातर्फे नवीन भरती धोरण व सेवा विनियम एकतर्फी व हुकूमशाही पद्धतीत बदल करण्यात येत आहे त्यामुळे अभियंत्यांनामध्ये नाराजी पसरली आहे, याशिवाय वीज बिल वसुलीबाबत प्रशासनातर्फे चालवलेल्या दबाव तंत्रामुळे व त्यामुळे वाढलेले मारण्याचे प्रकार या कारणांमुळे लोक सेवकाचा दर्जा देण्यात यावा, अशी अभियंता संघटनेची मागणी आहे. प्रलंबित मागण्यांवर अपेक्षित निर्णय न झाल्यास ६ सप्टेंबरपासून संप बेमुदत करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. अशा परिस्थितीत वीज ग्राहकांना वेठीस न धरण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.