विद्युत चोरांना पहिल्या चोरीसाठी दंड तर दुसऱ्या चोरीची पोलीस तक्रार

By Admin | Updated: April 6, 2015 00:48 IST2015-04-06T00:48:30+5:302015-04-06T00:48:30+5:30

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे आर्थिक वर्ष १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंत गोंदिया शहरात विद्युत चोरीचे ३८ प्रकरणे पकडण्यात आले.

Electric burglars have been fined for the first theft and second theft police complaint | विद्युत चोरांना पहिल्या चोरीसाठी दंड तर दुसऱ्या चोरीची पोलीस तक्रार

विद्युत चोरांना पहिल्या चोरीसाठी दंड तर दुसऱ्या चोरीची पोलीस तक्रार

आमगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे आर्थिक वर्ष १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंत गोंदिया शहरात विद्युत चोरीचे ३८ प्रकरणे पकडण्यात आले. या वीज चोरांकडून महावितरणने १६ लाख ७९ हजार २१५ रूपयांचा दंड वसूल केला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गोंदिया विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अबदुस सलाम यांनी सांगितले की, शहरात विद्युत चोरीवर अंकुश लावण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. १२ महिन्यात जवळपास प्रतिमहिना तीन विद्युत चोरीचे प्रकरणे पकडण्यात आले आहेत. या चोऱ्यांवरसुद्धा नियंत्रण केले जाईल.
विद्युत चोरीची पुष्टी करताना कार्यकारी अभियंता सला यांनी सांगितले की, संशयाच्या आधारावर वीज कंपनीचे कर्मचारी मीटरची तपासणी करतात. मीटर फॉल्टी आढळल्यावर विद्युत ग्राहकाकडून दीडपट दंडाची रक्कम वसूल करण्यास प्रथम प्राधान्य दिले जाते. तसेच या वसुलीच्या रकमेत व्याजसुद्धा जोडले जाते. ग्राहकांची बदनामी होवू नये यासाठी पहिल्या वेळी सापडलेल्या वीज चोरांची तक्रार पोलिसांत केली जात नाही. परंतु तोच व्यक्ती जर दुसऱ्यांदा वीज चोरीच्या प्रकरणात सापडला तर विद्युत वितरण कंपनी त्याची तक्रार पोलिसात करण्यास मागेपुढे पाहत नाही. परंतु विद्युत वितरण कंपनीद्वारे पोलिसांत तक्रार न करण्यात आल्याने चोरींच्या घटनांवर अंकुश लागू शकत नाही, ही जनमानसात चर्चा आहे. तसेच पहिल्या वेळीच जर विद्युत चोरांकडून दंड वसूल करण्याची तरदूत असेल तर विद्युत चोरांचे धाडस आणखी वाढू शकेल.
विद्युत मीटरमध्ये सेंसर लावणे किंवा रिमोर्ट द्वारे मीटरला छेडण्याच्या प्रकरणांत विद्युत ग्राहकाला रिमोर्ट कुठून मिळाला किंवा कोणत्या व्यक्तीद्वारे मीटरमध्ये सेंसर लावण्यात आला किंवा मीटरची गती कमी करण्यात आली, त्या व्यक्तीबाबत कसलीही चौकशी केली जात नाही. मीटरमध्ये तांत्रिक हेरफेर करण्यारे आरोपी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत विद्युत कंपनी वीज चोरीवर अंकुश लावण्यात यशस्वी होणे कठिणच आहे. रिमोटद्वारे विद्युत मीटरमध्ये हेरफेर करून चोरी करणारे आरोपी न पकडण्यामागे आरोपी विद्युत ग्राहकासह देवान-घेवानचे आरोपसुद्धा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांवर लावले जातात. गोंदिया शहरात जरी उद्योग मीटरधारक अधिक नसले तरी पहिली चोरीची शिक्षा केवळ दंड नितीच्या स्वरूपाची असल्याने विद्युत महामंडळाला नेहमीच आर्थिक नुकसान सहन करावा लागेल.(प्रतिनिधी)

कर्मचाऱ्यांचा अभाव
अतिरिक्त कार्यकारी अभियंता अबदुस सलाम यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे अनेकदा पोलिसात तक्रार करणे कठीण जाते. सद्यस्थितीत विद्युत चोरीच्या प्रकरणांत पोलिसात तक्रार काटोल रोड पोलीस ठाणे नागपूर येथे केली जाते.

Web Title: Electric burglars have been fined for the first theft and second theft police complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.