सभापतिपदी कोंडवानी, लांजेवार, भवसागर, बोपचे, ठाकूर यांची निवड
By Admin | Updated: February 16, 2017 00:20 IST2017-02-16T00:20:31+5:302017-02-16T00:20:31+5:30
नगर परिषद तुमसरच्या सहा विषय समितीच्या सभापती निवडीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली.

सभापतिपदी कोंडवानी, लांजेवार, भवसागर, बोपचे, ठाकूर यांची निवड
तुमसर न.प. विषय समिती निवडणूक : स्थायी समितीत राकाँला सदस्यपद
तुमसर : नगर परिषद तुमसरच्या सहा विषय समितीच्या सभापती निवडीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यात स्वच्छता वैधक व आरोग्य समिती सभापतीपदी न.पं. चे उपाध्यक्षा कांचन गोविंद कोंडवानी, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती रजनिश बाबुराव लांजेवार, शिक्षण समिती सभापती सचिन बाबुलाल बोपचे, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती मेहताबसिंह तुलसिराम ठाकुर, नियोजन व विकास समिती सभापती किशोर हरिराम भवसागर हे अपक्ष निवडून नगरसेवक आहेत.
महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा विक्रम लांजेवार व उपसभापती अर्चना आनंद भुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभागृहात पिठासिन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. तुमसर नगर परिषदेत एकूण २३ नगरसेवकापैकी १५ नगर सेवक हे भाजपचे, काँग्रेसचे ३, राका २, अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. निवडून आलेल्या तिन्ही अपक्ष उमेदवारांनी भाजपला पाटींबा दिल्याने अपक्षातून एकाला सभापती पद देण्याचे ठरले होते. त्यानुसार किशोर भवसागर यांची नियोजन व विकास समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. स्थायी समितीचे पदसिध्द सभापती नगराध्यक्ष प्रदीप पडोळे हे आहेत. सदस्यपदी राकाँचे शेख सलाम शेख दिलवर तुरक यांची वर्णी लागली तर कंचन कोडवाणी, रजनीश लांजेवार, सचिन बोपचे, मेहताब ठाकूर, किशोर भवसागर, वर्षा लांजेवार, पंकज बालपांडे यांची निवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
तुमसर शहराचा चौफर विकास हे लक्ष्य समोर ठेवून उपाध्यक्षांसह, सभापतीची उत्कृष्ठ चमुची निवड करण्यात आली आहे. विकासाला चालना मिळेल.
प्रदिप पडोळे,
नगराध्यक्ष, न.प. तुमसर