पदवीधर मतदार संघाची निवडणूक : जिल्ह्यात २३ केंद्रांवर झाले मतदान - ४४.२७ टक्के मतदान
By Admin | Updated: June 21, 2014 00:56 IST2014-06-21T00:56:57+5:302014-06-21T00:56:57+5:30
नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर हे सहा जिल्हे मिळून बनलेल्या विधान परिषदेच्या

पदवीधर मतदार संघाची निवडणूक : जिल्ह्यात २३ केंद्रांवर झाले मतदान - ४४.२७ टक्के मतदान
भंडारा : नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर हे सहा जिल्हे मिळून बनलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या एका जागेसाठी आज मतदान झाले. जिल्ह्यात २१,२६१ नोंदणीकृत मतदार असून केवळ ८,५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ४४.२७ टक्के मतदान झाले.
निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पदवीधर मतदारासंघाच्या या निवडणुकीकरीता जिल्ह्यातील ती विधानसभा क्षेत्रात २३ मतदान केंद्र होते. यात तुमसर विधानसभा क्षेत्रात सहा मतदान केंद्र, भंडारा विधानसभा क्षेत्रात १० आणि साकोली विधानसभा क्षेत्रात ७ मतदान केंद्रांचा समावेश होता. यात मोहाडी शहरात २, तुमसर शहरात ४, भंडारा शहरात ७, सावरी (जवाहरनगर), अड्याळ आणि पवनी येथे प्रत्येकी १, लाखनी शहरात २, साकोली शहरात २, लाखांदूर शहरात २ आणि पालांदूर येथे १ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली.
जिल्ह्यात २१,२६१ मतदारांमध्ये १६,१८२ पुरुष आणि ५,०७९ महिला मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी ४० टक्के मतदारांनी मतदानाचा
हक्क बजावला. या निवडणुकीत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. सर्वच मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया धिम्यागतीने सुरू
होती. सायंकाळी ४ वाजतापर्यंत स्थिती तशीच होती. सकाळी ८ वाजतापासून दुपारी २ वाजतापर्यंत ५,२५१ पुरूष आणि १,२६५ महिलांसह
६,५१६ मतदारांनी मतदान केले. दुपारी २ पर्यंत ३०.६५ टक्के मतदान झाले होते. दुपारी ४ वाजतापर्यंत ४४.२७ टक्के मतदान झाले.
पवनीत ४५.६७ टक्के मतदान
पवनी शहरात एकूण ४५.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पवनी तालुक्यात १,३८६ मतदार असून ६३३ मतदारांनी मतदान
केले. (जिल्हा प्रतिनिधी)