निवडणूक तोंडावर, उमेदवार ठरेना !

By Admin | Updated: October 27, 2016 00:23 IST2016-10-27T00:23:03+5:302016-10-27T00:23:03+5:30

विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना घोषित होऊन आठ दिवस झाले.

Election of the candidate, the candidate! | निवडणूक तोंडावर, उमेदवार ठरेना !

निवडणूक तोंडावर, उमेदवार ठरेना !

विधान परिषद निवडणूक : पहिल्या दिवशी २३ अर्जांची उचल, आघाडीबाबत निर्णयाच्या विलंबामुळे मतदार संभ्रमात
भंडारा : विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना घोषित होऊन आठ दिवस झाले. बुधवारपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी २३ अर्जांची उचल झाली आहे. परंतु, अद्याप एकाही पक्षाचा उमेदवार अधिकृतरित्या घोषित झालेला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे.
४ डिसेंबर रोजी कार्यकाळ संपणाऱ्या विधान परिषदेच्या राज्यातील सहा जागांसाठी १९ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. सद्यस्थितीत चार जागा राष्ट्रवादीकडे तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस व भाजपकडे आहे. त्यावेळी केंद्र व राज्यात आघाडीचे सरकार होते. आता दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार सत्तारूढ आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार राजेंद्र जैन यांची उमेदवारी पक्की मानली जात असून त्यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक आहे.
भाजपकडून नागपूर महानगर पालिकेचे सदस्य परिणय फुके यांच्या नावाचीही अद्याप घोषणा झालेली नाही. या निवडणुकीची चाहुल सुरू झाली त्यापूर्वीपासूनच गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांचे चिरंजीव प्रफुल अग्रवाल यांनी ही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. आजघडीला ते मतदारांच्या संपर्कात असून ते ही निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळेची ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. यापूर्वीची २०१० मध्ये झालेली निवडणूक दुहेरी झाली होती. या निवडणुकीत राजेंद्र जैन हे विजयी झाले होते. मागील काही महिन्यांपासून ते मतदारांच्या संपर्कात आहेत. भंडारा, तुमसर नगर पालिका, जिल्हा परिषदेत आघाडीचे मते सर्वाधिक आहेत. त्यामुळे या निवडणुकीबाबत पक्षश्रेष्ठी स्तरावर राज्यात आघाडी होणार किंवा नाही या निर्णयाची प्रतिक्षा सुरू आहे. असे असले तरी होणाऱ्या विलंबामुळे मतदार मात्र पेचात सापडले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

नगरसेवकांच्या आशा पल्लवित
राज्यात नगर परिषद निवडणुकांची घोषणा विधान परिषद निवडणुकीच्या घोषणेपूर्वी झाली. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापासून आपल्याला वंचित तर राहावे लागणार नाही ना! अशी भीती नगरसेवकांना वाटत होती. परंतु विधान परिषद निवडणूक घोषित होताच निसटलेला डाव साधल्यामुळे नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नवनिर्मित मोहाडी, लाखनी व लाखांदूर नगरपंचायतमधील नगरसेवकांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळाल्यामुळे यावर्षी नगरसेवकांची दिवाळी आनंददायी वातावरणात जाणार आहे.

तोंडओळखीसाठी बैठक
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवाराची तोंडओळख करून देण्यासाठी जिल्हा भाजपने रविवारला बैठक घेतली होती. या बैठकीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी आणि आमदारद्वयांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीत भाजपचे उमेदवार परिणय फुके यांची सर्वांना ओळख करून देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या सूचना सर्वांना सांगण्यात आले.

Web Title: Election of the candidate, the candidate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.