Eight patients in the district became coronary free | जिल्ह्यात आठ रुग्ण झाले कोरोनामुक्त

जिल्ह्यात आठ रुग्ण झाले कोरोनामुक्त

ठळक मुद्देनवीन रुग्ण नाही : क्रियाशील रुग्ण २२, रुग्णालयातून मिळाली सुटी, १७५१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. एका रुग्णास यापूर्वीच सुटी देण्यात आला असल्याने सुटी देण्यात आलेल्यांची संख्या ९ झाली आहे. सोमवारी एकही नवीन रुग्ण आढळला नसून जिल्ह्यात क्रियाशील रुग्णांची संख्या २२ वर आली आहे. एकूण बाधित संख्या ३१ आहे.
ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.
आतापर्यंत १९०८ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी ३१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर १७५१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १२६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
सोमवारी जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये ३३ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३१६ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नर्सिंग होस्टल भंडारा क्वारंटाईन मध्ये १४ व्यक्ती भरती आहेत.
तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे ४२५ असे एकूण ४३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये भरती आहेत. ११६९ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून ३९४५७ व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून २६६१७ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या १२७४० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी २८ दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

‘ते’ कोरोनामुक्त रुग्ण तुमसरातील
तुमसर : तालुक्यातील ग्रामीण भागात मुंबई येथून आलेल्या एका २९ वर्षीय तरूणाला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनाही संस्थात्मक क्वारंटाईन करून घश्याचे नमूने तपासणीसाठी पाठविले होते. त्या सर्वांचेही नमूने निगेटिव्ह आले आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेले हे रुग्ण तुमसर तालुक्यातील आहेत. त्या सर्वांना भंडारा रुग्णालयातून सुटी देत होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे यांनी दिली.

Web Title: Eight patients in the district became coronary free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.