शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

वांग्यांच्या ४० रुपये किलो दराने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 05:00 IST

श्राद्ध घरोघरी सुरू झालेले आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्याने एकमेकांच्या घरी ये-जा सुरू झालेली आहे. लहान-मोठे कार्यक्रमही पार पडत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला निश्चितच मागणी वाढली आहे. मागणी पुरवठा याचा विचार करता पुरवठा कमी झाला असून, मागणी अधिक वाढल्याने गत पंधरा दिवसांच्या पूर्वीचे भाज्यांचे दर आता दुपटीने वाढले आहेत. निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी सापडलेला आहे.

मुखरू बागडे लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दररोजच्या महत्त्वाच्या भाज्यात वांग्याला अधिक महत्त्व आहे. हटकून बाजारात प्रत्येक घरात वांगे खरेदी केले जातात. वांग्याचे उत्पन्न कमी झाले असून मागणी वाढल्याने वांग्याचे दर ४० रुपये किलो प्रतिदराने विकत आहेत. राजकीय भाषेत वांग्याला अच्छे दिन आल्याची चर्चा भाजी बाजारात होत आहे. श्राद्ध घरोघरी सुरू झालेले आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्याने एकमेकांच्या घरी ये-जा सुरू झालेली आहे. लहान-मोठे कार्यक्रमही पार पडत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला निश्चितच मागणी वाढली आहे. मागणी पुरवठा याचा विचार करता पुरवठा कमी झाला असून, मागणी अधिक वाढल्याने गत पंधरा दिवसांच्या पूर्वीचे भाज्यांचे दर आता दुपटीने वाढले आहेत. निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी सापडलेला आहे. गत दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाचे दिवस असल्याने वांगी पिकाला किडीचा त्रास अधिकच जाणवत आहे. किडीने चांगले वांग्याचा बाजारात पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे वांग्याला अच्छे दिन आलेले आहेत. शेतकऱ्याच्या वांगी कमी जरी निघत असला तरी भाव अर्थात दर चांगला असल्याने शेतकरीसुद्धा समाधानी दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात भाजीपाल्याची शेती सुधारलेली आहे. ठिबक मल्चिंगचा आधार घेत भाजीपाल्याची शेती केली जात आहे. अख्ख्या पावसातही जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पन्न सुमार आहे. गत पंधरा दिवसांपूर्वी भाजीपाल्याचे भाव जमिनीवर आले होते. मात्र आता भाजीपाल्याला अच्छे दिन आले असून सर्वात जास्त भाव वांग्याला मिळत आहे. प्रतिकिलो ४० रुपये दराने अगदी काही वेळातच व्यापारी वांग्याला मागणी मिळत आहे. बीटीबी सब्जी मंडी भंडारा येथे चवळी शेंग ३५रुपये किलो, वांगे ४० रुपये किलो, कारले ३० रुपये किलो, फुलकोबी २० रुपये किलो, टमाटर २२० रुपये कॅरेट, मिरची २० रुपये किलो, मेथी भाजी शंभर रुपये किलो, भेंडी २० रुपये किलो, दोडका/ तुरई २० रुपये किलो दर सुरू आहे.

वांगा पिकावरील कीड नियंत्रणाकरिता रासायनिक कीटकनाशक व्यतिरिक्त आणखी इतर उपाय शेतकऱ्यांना सुचविलेले आहेत. विषमुक्त अन्न उपक्रमांतर्गत कीडनाशकात काही पर्याय सुचविलेले आहेत. नैसर्गिकता काही प्रमाणात कीड नियंत्रण शक्य आहे. शेतकऱ्यांनी वांग्याच्या बागेत प्रयोग करून अभ्यास घ्यावा.-किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी, लाखनीभंडारा जिल्हा भाजीपाल्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे. मात्र मागणीच्या तुलनेत वांग्याची आवक कमी झाल्याने बाजारपेठेत वांग्याला सर्वाधिक भाव आहे. वांग्याच्या खालोखाल इतरही भाज्यांना बरा भाव आहे. शेतकऱ्यांनी बागेची नीट काळजी वेळेत घेऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करावा. -बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी भंडारा. वांग्याच्या पिकाला किडीचासुद्धा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याने कीडग्रस्त वांग्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे वांग्याचे उत्पन्न कमी झालेले आहे. त्यामुळे भाव चाळीस रुपयांच्या घरात आहे. -टिकाराम भुसारी, वांगा उत्पादक शेतकरी, पालांदूर 

 

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या