शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ चूक दुरुस्त करणार

By admin | Updated: October 12, 2014 23:30 IST

महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारा प्रकाशित इयत्ता अकरावी व बारावी राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकात प्रधानमंत्री या योग्य, शासनमान्य व संविधानिक शब्दाऐवजी

भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारा प्रकाशित इयत्ता अकरावी व बारावी राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकात प्रधानमंत्री या योग्य, शासनमान्य व संविधानिक शब्दाऐवजी पंतप्रधान हे चुकीचे व असंवैधानिक शब्द छापल्याची चूक बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरचे अध्यक्ष अनिल कानेकर यांनी निदर्शनास आणून देताच मंडळाने आपली सहमती पत्राद्वारे दर्शवून चूक दुरुस्ती करून शुद्धीपत्र काढत असल्याचे पत्र पाठविले आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावीसाठी २०१२ मध्ये व बारावीसाठी २०१३ मध्ये राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन केले. अकरावीच्या पुस्तकात चार वेळा व बारावीच्या पुस्तकात एकशे बावीस वेळा पंतप्रधान शब्द छापलेला आहे. बप्रमंला अध्यक्षांनी आपल्या ३१ जुलै २०१४ च्या निवेदनातून मंडळाच्या निदर्शनास आणून दिले की, दि कान्स्टिट्युशन आॅफ इंडिया अनुच्छेद ७४ (१) व ७५ (१) मध्ये प्राईम मिनीस्टर शब्द आल्याने ते संविधानिक आहे. महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या शासन व्यवहार कोश २००० शासन व्यवहार शब्दावली (मराठी इंग्रजी) २००५ न्याय व्यवहार कोश २००८ मध्ये प्राईमचा अर्थ पंत नसून प्रधान आहे व मिनिस्टर चा अर्थ प्रधान नसून मंत्री आहे व प्राईम मिनिस्टरचा अर्थ पंतप्रधान शब्द नसून प्रधानमंत्री शब्द आहे. म्हणून पंतप्रधान या चुकीच्या शब्दाऐवजी प्रधानमंत्री हे योग्य शासनमान्य व संवैधानिक शब्द स्वीकारून त्वरीत शुद्धीपत्र छापून झालेली चूक दुरुस्त करण्याची मागणी केली होती. तसेच माहिती अधिकार अधिनियम २००५ चा वापर करून १९ सप्टेंबर २०१४ च्या पत्रातून आपल्या निवेदनानुसार (३१.७.२०१४) मंडळाने केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली होती. मंडळाने मागणीचे गांभीर्य ओळखून पत्राद्वारे कळविले की, बप्रमंच्या पत्राला उच्च माध्यमिक राज्यशास्त्र विषय अभ्यास मंडळाच्या सभेत अभिप्रायासाठी ठेवण्यात आले होते. अभ्यास मंडळाच्या अभिप्रायानुसार इयत्ता ११ वी १२ वी राज्यशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकात पंतप्रधान ऐवजी प्रधानमंत्री असा बदल करण्यात येत आहे. तसेच मंडळाच्या शिक्षण संक्रमण अंकातून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना माहितीसाठी परिपत्रकान्वये कळविण्यात येत आहे. सचिवांनी पत्राचा मुळ मसूदा मान्य केला असल्याचा शिक्का मारून पत्राद्वारे कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)