ग्रीन फ्रेंडस्तर्फे पर्यावरणस्नेही रांगोळी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:48 IST2018-11-10T21:47:54+5:302018-11-10T21:48:10+5:30

येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब लाखनी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुका शाखा लाखनी त्याचप्रमाणे नैसर्गिक पर्यावरण संसाधन व मानवता जिल्हा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने पर्यावरणपुरक दिवाळीनिमित्त पर्यावरण संदेश जागृती रांगोळी स्पर्धा लाखनी बसस्थानकावर आयोजित करण्यात आल्या.

Eco-friendly Rangoli competition by Green Friend | ग्रीन फ्रेंडस्तर्फे पर्यावरणस्नेही रांगोळी स्पर्धा

ग्रीन फ्रेंडस्तर्फे पर्यावरणस्नेही रांगोळी स्पर्धा

ठळक मुद्देआकर्षक ‘पर्यावरण संदेश’ रांगोळीने सजले लाखनी बसस्थानक

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब लाखनी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुका शाखा लाखनी त्याचप्रमाणे नैसर्गिक पर्यावरण संसाधन व मानवता जिल्हा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने पर्यावरणपुरक दिवाळीनिमित्त पर्यावरण संदेश जागृती रांगोळी स्पर्धा लाखनी बसस्थानकावर आयोजित करण्यात आल्या. यावेळी साकोली आगार व्यवस्थापक गौतम शेंडे, लाखनी बसस्थानकचे वाहतुक नियंत्रक बी. एन. डहाके, ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबचे कार्यवाह व अभा अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष, प्रा. अशोक गायधने, ग्रीनफ्रेडस व अभा अनिसचे तालुका अध्यक्ष अशोक वैद्य, ग्रीनफ्रेंडस व अभा अनिसचे तालुका पदाधिकारी दिनकर कालेजवार, योगेश वंजारी, राष्टÑीय हरित सेना सिध्दार्थ विद्यालयाचे प्रभारी व ग्रीन फ्रेंडसचे पदाधिकारी दिलीप भैसारे, स्वप्नपुर्ती फाऊंडेशनचे संघटक प्रशांत वाघाये, एम. डी. एन फयुचर स्कूलचे लाखनीचे प्रशासकीय अधिकारी प्रणय दत्तराज साकोलीचे निसर्गमित्र शुभम बघेल, आदित्य शहोर, युवराज बोबडे, ग्रीनफ्रेंडसचे नितीन पटले, पंकज कावळे, हिमांशु चन्ने, आकाश मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आकर्षक व सुंदर अशा पर्यावरण जागृती संदेशावर रांगोळ्या दिपावलीच्या पर्वावर स्पर्धकांनी काढल्या.
रांगोळीचे परिक्षण सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार, डॉ. पी. कागदे, सहायक शिक्षक सेलोटी, ग्रीनफ्रेंडसचे प्रा. अशोक गायधने, अशोक वैद्य यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नेमिता नामदेव पाखमोडे हिला प्राप्त होऊन १५०० रुपयांचे पारितोषीक प्राप्त झाले. द्वितीय क्रमांक पुनम झिंगरे हिला प्राप्त होवून १००० रुपये पारितोषीक प्राप्त झाले. तृतीय क्रमांक दिप्ती विजय गरपडे हिच्या रांगोळीला प्राप्त झाले. तिला ७५१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेत चतुर्थ क्रमांक सलोनी प्रकाश चन्ने यांच्या रांगोळीला प्राप्त होऊन ५०० रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. पाचवे क्रमांक डिमाल सतीश उईके यांच्या रांगोळीला प्राप्त होऊन २५१ रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. सहावे क्रमांक श्रेया दिलीप भैसारे यांच्या रांगोळीला प्राप्त होवून २०० रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. प्रोत्साहनपर १५० रुपये बक्षीस सलोनी युवराज कोरे व प्रगती तरोणे यांना प्रत्येकी प्राप्त झाले. तर प्रोत्साहनपर १०० रुपयांचे बक्षीस भाविका चोचेरे व नम्रता चाचेरे यांना तसेच साहिल विजय युवनाथे यांना प्राप्त झाले.

Web Title: Eco-friendly Rangoli competition by Green Friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.