शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

करडीत रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST

रस्ते कंत्राटदार व विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कुरण ठरले आहेत. परिसरातील एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. रस्ते दुरुस्तीच्या नावावर मलाई खाण्याचे काम झाले. करडी ते पालोरा मार्गावर विद्युत उपकेंद्राजवळ मोरीचे बांधकाम करताना व्यवस्थित दबाई न केल्याने आज त्या ठिकाणी खोल खड्डा व आडवी नाली पडली आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारांच्या चुकांचा परिणाम : सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील सर्व रस्त्यांना खोल खड्डे, आडव्या नाल्या व तुटलेल्या कडांचे ग्रहण लागले आहे. रस्ते विकासाचा मार्ग प्रशस्त करतात. परंतु हेच रस्ते कंत्राटदार व विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कुरण ठरले आहेत. परिसरातील एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. रस्ते दुरुस्तीच्या नावावर मलाई खाण्याचे काम झाले. करडी ते पालोरा मार्गावर विद्युत उपकेंद्राजवळ मोरीचे बांधकाम करताना व्यवस्थित दबाई न केल्याने आज त्या ठिकाणी खोल खड्डा व आडवी नाली पडली आहे.करडी परिसर विकासापासून कोसो दूर आहे. कोका वन्यजीव अभयारण्य व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सानिध्यात वसलेल्या या भागाला कमाईचे साधन म्हणून वापरले गेले. त्यामुळे परिसरात सिंचनाच्या कोणत्याही सुविधा नाही. काही तलावांची तात्पुरती मलमपट्टी करून स्वत:ची पाठ थोपटण्यात आली. वैनगंगा नदी खोºयातील सुपीक शेती तसेच निसर्गाचे वरदान लाभले असताना पाहिजे तसे उद्योग लागले नाही. मोहाडी तालुक्याशी जोडणाºया पुलाचा प्रश्न सोडविता आला नाही. वन्यप्राण्यांपासून गावाचे व पिकांचे नुकसान होत असताना तारेचे कुंपण करण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही.करडी परिसरातील पालोरा ते खडकी, पालोरा ते बोरगाव, खडकी ते करडी, बोरगाव ते पांजरा, करडी ते देव्हाडा, निलज खुर्द पोचमार्ग, मुंढरी खुर्द व मुंढरी बुज पोचमार्ग, निलज बुज पोचमार्ग, जांभोरा ते पालोरा आदी व अन्य रस्ते यातना भोगत आहेत. पर्यायाने या रस्त्यांवरून वाहतूक करणाºया लोकांचे हाल होत आहेत. रस्त्यांच्या दुरुस्ती संबंधाने अनेकदा मागणी करण्यात आली. परंतु एक ते दोन किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यांची दुरुस्ती करून स्वत:ची पाठ थोपटण्यात आली. काही रस्त्यांना तर केवळ बीबीएम करून मोकळे सोडण्यात आले. बोंडे ते मुंढरी बुज. रस्त्यांची अवदशा तर त्यापेक्षाही वेगळीच आहे. विकासाच्या नावावर रस्त्याच्या दोन्ही बाजू तीन मीटरपर्यंत खोदण्यात आल्या. परंतु उन्हाळ्यापासून काम सुरु होण्याचे नाव नाही. निव्वळ दुरुस्तीच्या नावावर मलाई खाण्याचे धोरण राबविण्यात आल्याने आज पावसाळ्यानंतर सर्वच रस्त्याची पार एैसीतैसी झाली आहे. करडी ते पालोरा मार्गावरील विद्युत उपकेंद्राजवळ पडलेली खोल नाली आता वाहतुकदारांसाठी जीवघेणी ठरू पाहत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा