शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

शारीरिक तंदुरुस्तीसाठी पौष्टिक अन्नाचे सेवन आणि व्यायाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 6:00 AM

भंडारा तालुक्यातील दवडीपार (बेला) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच दिनेश बांते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश राखडे होते.

ठळक मुद्देकिशोर ठवकर : दवडीपारच्या जिल्हा परिषद शाळेत तंबाखूजन्य पदार्थांची होळी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्याच्या युगात पौष्टिक अन्न, हिरव्या पालेभाज्या, फळे खाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती ही कमी झालेली आहे. जंक फूड खाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कर्करोग हा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. पण शारीरिक तंदुरुस्तीसाठी उपयोगी असणारे पौष्टिक अन्नाचे सेवन आणि व्यायाम केला तर आपली प्रतिकार शक्ती वाढून ती आपणाला कर्करोगापासून दूर ठेवते, असे प्रतिपादन सलाम मुंबई फाऊंडेशनचे जिल्हा सभासद किशोर ठवकर यांनी केले.भंडारा तालुक्यातील दवडीपार (बेला) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच दिनेश बांते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश राखडे होते.सर्वप्रथम तंबाखूमुक्तीचा संदेश देण्यासाठी ढोलताशाच्या गजरात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. तंबाखूची नशा-जीवनाची दुर्दशा, तंबाखू मतलब खल्लास या सारख्या घोषणा देत विद्यार्थी रस्त्याने जात होते. प्रभातफेरी शाळेत आल्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरवर्षी सुमारे सात लाख लोकांना कर्करोगाची लागण होते. त्यामध्ये सुमारे चार लाख लोक तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण असतात. तंबाखू सेवनाने सुमारे दोन हजार बळी पडतात. सुमारे दोन लाख महिलांना स्तन कर्करोगाची लागण झाली आहे. सुमारे तीन लाख महिलांना गर्भाशय कर्करोगाची लागण झाली आहे. त्यामुळे तंबाखु सेवणानेच कर्करोग होऊ शकतो, असे नाही तर आपले सदोष खानपान सुद्धा कर्करोगाला निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे सावध होऊन प्रत्येकाने कर्करोगाशी लढले पाहिजे, असे आवाहन आपल्या प्रस्ताविकामधून मुख्याध्यापक दशरथ जिभकाटे यांनी केले. सुरवातीला पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. नेहा राखडे, समीक्षा राखडे, प्रिया बांते, सानिया बांते या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मानवी शरीरात कारसिनोजीन नावाचा घटक असतो. तो काही लोकांमध्ये सक्रीय तर काही लोकांमध्ये तो निष्क्रिय असतो. हा घटक सक्रीय असणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. हा घटक सक्रिय असणाºया लोकांनी तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होतो. शरीरात आतडे, तोंड, जीभ, ओठ, घसा, स्वरयंत्र अशा कर्करोग होण्याच्या जागा आहेत. पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाला सामोरे जावे लागते, असे प्रतिपादन सहायक शिक्षक कैलास बुद्धे यांनी केले. यावेळी अरविंद बारई, दिनेश बांते यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये कैलास बुद्धे यांनी तंबाखूमुक्तीची शपथ दिली. आयुष्यभर तंबाखू पासून लांब राहण्याचा सल्ला दिला. शालेय विद्यार्थ्यांनी तंबाखूचे दुष्परिणाम या पोस्टर्स स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच व्यसनमुक्ती संदेश देणारे नाटक सादर करण्यात आले. स्पर्धांमध्ये सहभागीविद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.शालेय आवारामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची प्रतीकात्मक होळीचे दहन करण्यात आले. होळीला तंबाखूच्या पुड्याचे आणि घोषणांचे तोरण गुंफण्यात आले. खाली फुलांची रांगोळी काढण्यात आली. संचालन कैलास बुद्धे यांनी केले तर आभार अरविंद बारई यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दशरथ जिभकाटे, कैलास बुद्धे, अरविंद बारई, सुनंदा सावरबांधे, कल्पना रामटेके, नंदू बनसोड, मीना सेलोकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Healthआरोग्य