शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

देव्हाडी रेल्वे उड्डाणपूल अडकला ‘जीएसटी’त

By admin | Published: July 17, 2017 12:25 AM

वस्तू व सेवा कराबाबतची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल निविदेला ‘जीएसटी’चा फटका बसला

४२ कोटींचा उड्डाणपूल : तांत्रिक अडचण, आॅक्टोबर २०१७ पर्यंत होती पूर्णत्वाची मुदत, राज्य शासनाने दिली सहा महिन्यांची मुदत मोहन भोयर। लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वस्तू व सेवा कराबाबतची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल निविदेला ‘जीएसटी’चा फटका बसला असून काही तांत्रिक अडचणीत रेल्वे उड्डाणपुल जीएसटीत अडकल्याची माहिती आहे. देव्हाडी येथे राज्य शासनाचे मुख्य अभियंत्यासह, अधीक्षक अभियंता व इतर अधिकाऱ्यांनी नुकतीच कामांची पाहणी केली. फिल्टर मिडीयाची माहिती जाणून कंत्राटदार व अभियंत्यांना निर्देश दिले.राज्य शासन व रेल्वे विभागाचा संयुक्त रेल्वे उड्डाणपुल देव्हाडी येथे रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर तयार होत आहे. उड्डाण पुलाची एकुण किंमत ४२ कोटी इतकी आहे. राज्य शासन २६ कोटी तर रेल्वे विभाग १६ कोटी रूपये येथे बांधकामावर खर्च करणार आहे. राज्य शासनाने प्रत्यक्ष कामाला जून २०१४ मध्ये सुरूवात केली होती. पोचमार्ग तयार करण्याचे काम राज्य शासनाकडे आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये हा पोचमार्ग पूर्णत्वास करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु स्थानिक अडचणींमुळे त्यात सहा महिन्यांची वाढ राज्य शासनाने दिल्याची माहिती आहे. मार्च २०१८ अखेर दोन्ही पोचमार्ग पूर्णत्वास येणार आहेत.रेल्वे येथे ८० मिटर मुख्य सिमेंट पुलाचे कामे करणार आहे. परंतु रेल्वेची निविदा मागील महिन्यापर्यंत निघाली नव्हती. रेल्वेने निविदा या महिन्यात काढली. एका कंत्राटदाराला येथे कंत्राट प्राप्त झाले. परंतु जून महिन्यापासून देशात जीएसटीचा कायदा आला. त्या कायद्यात ही निविदा अडकल्याची माहिती आहे. काही तांत्रिक बाबी येथे पुढे आल्याची माहिती आहे. तांत्रिक बाबीत रेल्वेची निविदा येथे अडकल्याचे समजते. त्यामुळे रेल्वे उड्डाणपुल पूर्णत्वाला पुन्हा वेळ लागण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने नागपूर विभागाचे मुख्य अभियंता देबटवार, अधीक्षक अभियंता नवघरे, कार्यकारी अभियंता नरेश वडेटवार, उपविभागीय अभियंता भट, उड्डाणपुलाचे प्रोजेक्ट अभियंता बी. आर. पिपरेवार, तुमसरचे उपविभागीय अभियंता खंडेलवाल, मोहाडीच्या उपविभागीय अभियंता विजया सावरकर, कंत्राटदार भंसाली यांनी उड्डाणपुल बांधकामाचे निरीक्षण केले. फिल्टर मिडीयाची माहिती मुख्य अभियंता देबटवार यांनी जाणून घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले. दोन्ही अ‍ॅप्रोच (पोचमार्ग) मार्गावरील सर्व्हीस रोडवरील खड्डे बुजविण्याचे व रस्ता तयार करण्याचे आदेश यावेळी मुख्य अभियंत्यांनी दिली. २४ तास वाहतुकीचा मार्ग असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अप्रोच मार्गावर घालत असलेल्या अ‍ॅश (राख) बाबत आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळ्यात सर्व्हीस रस्ता निसरडा नसावा अशा सूचना त्यांनी दिल्या.