वनविभागाच्या जंगलात रेतीची डम्पिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:01:15+5:30
हरदोली शिवारातील वनविभागाच्या राखीव जागेत रेतीचा अनधिकृत डम्पिंग यार्ड उभारण्यात आला आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे विस्तीर्ण खोरे आहेत. या नदींच्या पात्रातून रेतीची विदर्भासह अन्य राज्यात मोठी मागणी आहे. यामुळे रेतीच्या दरातही चांगलीच वाढ दिसून येते. एकीकडे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असताना अनधिकृतपणे रेतीची साठवणुकही करण्यात आली आहे.

वनविभागाच्या जंगलात रेतीची डम्पिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : विधानसभा निवडणुकीच्या कामात प्रशासन यंत्रणा व्यस्त असल्याचा फायदा घेत सिहोरा परिसरात रेतीमाफीया सक्रीय झाले आहेत. हरदोली शिवारातील वनविभागाच्या राखीव जागेत रेतीचा अनधिकृत डम्पिंग यार्ड उभारण्यात आला आहे.
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे विस्तीर्ण खोरे आहेत. या नदींच्या पात्रातून रेतीची विदर्भासह अन्य राज्यात मोठी मागणी आहे. यामुळे रेतीच्या दरातही चांगलीच वाढ दिसून येते. एकीकडे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असताना अनधिकृतपणे रेतीची साठवणुकही करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवरील कवलेवाडा गावाच्या शेजारी धरणाचे बांधकाम झाल्याने रेती तस्करांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. यामुळे मांडवी गावाच्या शेजारी परसवाडा गावात रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे.
धरणाचा उर्ध्व भागात नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने रेतीचा उपसा वाढला आहे. पांजरा घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरु आहे. परंतु या रेतीचा साठा गावाशेजारी न करता रेती माफीयांनी नविन शक्कल लढवित महसुल आणि वनविभागाच्या राखीव जागेत रेतीची साठवणूक केली आहे. हरदोलीचे सहायक वनपरिक्षेत्र कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. हरदोली ते दावेझरी मार्गावर रहदारी करताना सदर डम्पींग यार्ड सर्वांचेच लक्ष वेधून घेते. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष कसे? याबाबतही चर्चा रंगली आहे. परिणामी रितसर कारवाई होणार तरी कशी?असेही बोलले जात आहे.
रेतीची तस्करी दिवसाढवळ्या सुरु असताना हजारो ब्रास रेतीची विक्रीही सुरु आहे.