शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या अपडाऊनमुळे विकासकामांना खीळ

By admin | Updated: November 22, 2014 22:56 IST

ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची अ‍ॅलर्जी असल्याचे दिसत असून त्यांच्या सततच्या अपडाऊनमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना खीळ बसली आहे.

भंडारा : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची अ‍ॅलर्जी असल्याचे दिसत असून त्यांच्या सततच्या अपडाऊनमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना खीळ बसली आहे.शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य असताना शासनाच्या नियमाचे पालन न करता अनेक ग्रामसेवक अपडाऊन करीत आहेत. त्यांच्या अपडाऊनमुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. याशिवाय गावातील अनेक विकासात्मक कामांना खीळ बसते, तसेच जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांचा विकास व्हावा यासाठी शासन विविध विकासात्मक योजना कार्यान्वित करून करोडो रूपये खर्च करते. मात्र प्रत्यक्ष यंत्रणेतील अंमलबजावणी काही कर्मचारी आपले कर्तव्य इमाने इतबारे न बजावता कामात कुचराई करीत असल्याने अनेक विकास कामे अपेक्षेनुसार होत नाहीत. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच विकासाच्या कामात टक्केवारी हे प्रकार अलीकडे जास्तच उदयास आल्याने विकास कामाचा दर्जा बेसुमार घसरतो. याशिवाय ग्रामस्थांना विविध कामासाठी दाखल्याची आवश्यकता असते. मात्र अनेकदा दाखला देण्यास विलंब होत असल्याने अनेकांना योजनेपासून वंचित राहण्याची पाळी येते. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता वेळेत दाखल्याची आवश्यकता असते. भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यास नॉट रिचेबल दाखविण्यात येते. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी जाब विचारल्यास पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या ठिकाणी बैठकी असल्याची वेळकाढू कारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. या ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवण्याचे काम पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांच्यावर असते. परंतु हे अधिकारी याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)