शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

भोवळ आली, पडले अन् गेला जीव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 16:24 IST

Bhandara : १० दिवसात ६ जणांचा आकस्मिक मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अचानकपणे भोवळ आल्याने पडल्यावर काही कालावधीनंतर मृत्यू होण्याच्या ६ घटना मागील १० दिवसात जिल्ह्यात घडल्या आहेत. सध्या नवतपा सुरू असून, तापमान ४५ ते ४६वर पोहचले आहे. हे मृत्यू उष्माघाताचे की, अन्य कशामुळे झाले, याबद्दल आरोग्य विभागाने स्पष्ट केले नसले तरी उष्णतामान वाढल्यानेच या घटना घडल्याचा अंदाज लावला जात आहे.

या सर्व घटनांमधील पार्श्वभूमी अगदी समान आहे. बहुतेक घटना दुपारच्या सुमारास घडल्या आहेत. भोवळ येणे हे त्यातील प्रमुख कारण आहे. जिल्ह्यात आठवड्यापासून तापमान वेगाने वाढले आहे. रात्रीच्या तापमानातही वाढ झाली असून, ते ३७ ते ३८ राहात आहे. कामानिमित्त तसेच शेतावर शेतकऱ्यांना जावेच लागले. कडक उन्हाचा प्रकोप सहन न झाल्याने अनेकांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या तक्रारी डॉक्टरांकडे वाढल्या आहेत.

गुराख्याचा उपचारादरम्यान मृत्यूलाखांदूर: शेत शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेला गुराखी उष्णतेने भोवळ येऊन जमिनीवर पडला. या घटनेची माहिती रात्री उशिरा गुराख्याच्या कुटुंबीयांसह नागरिकांना लक्षात आली. त्यानंतर शेतावर पोहचून उपचारासाठी त्याला लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिकच गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता दोन दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भाष्कर तरारे (५२) असे या गुराख्याचे नाव असून, ही घटना ३० मे रोजी मांढळ येथे घडली.

२८ मे रोजी भाष्कर तरारे दुपारच्या सुमारास पाळीव जनावरे घेऊन चराईसाठी गावालगतच्या शेतशिवारात गेला होता. दुपारी जनावरे चरत असताना शेतशिवारात उभा असताना भोवळ आली. त्यामुळे तो जमिनीवर पडला. सोबत कोणीच नसल्याने ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. तो तसाच पडून राहिला. सायंकाळ झाल्यावर जनावरे स्वतःहून गावाकडे परतून घरीही पोहचली. मात्र, उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी शेतशिवारावर शोध घेतला असता शेतशिवारात बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच गंभीर असल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ३० मेच्या दुपारी मृत्यू झाला.

...हे आहेत संभाव्य उष्माघाताचे ६ बळी• पहिल्या घटनेत लाखांदूर येथील इश्वर नारायण लोहारे या ६० वर्षीय शेतकऱ्याचा २० मे रोजीच्या दुपारी शेतामधून घरी परत येताना भोवळ आल्याने मृत्यू झाला होता. कापलेले धान जमा करून ते गावाकडे येताना ही घटना घडली.• पवनी तालुक्यातील पिपळगाव येथील शेतकरी चंद्रशेखर बाबूराव जीपकाटे (४७) हे २० मेच्या सकाळी आपल्या घरीच खुर्चीवरून उठताना भोवळ येऊन पडले व त्यानंतर मृत झाले होते. • २६ मेच्या दुपारी जनावरे विकून ब्रह्मपुरीहून मेटॅडोरमधून परत येताना लाखांदूर येथील संतोष विठ्ठल नहाले (४०) यांचा भोवळ आल्याने मृत्यू झाला होता. ही घटना प्रवासादरम्यान घडली होती. •  २६ मे रोजी मौदा येथील श्यामराव बकाराम चाचेरे या व्यक्तीचा भंडारा शहरातील बाजारात भोवळ येऊन मृत्यू झाला होता. झालेल्या या आकस्मिक मृत्यूची दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. वाढत्या उष्णतेमुळे हे घडण्याची शक्यता असल्याने उष्माघाताचे मृत्यू असे म्हणता येईल. या संदर्भात शासकीय स्तरावरुन मदतीचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहे.• २९ मेच्या दुपारी आपल्या घराजवळच्या अंगणाचे मोजमाप करताना सोनी (ता. लाखांदूर) या गावातील गोपाळा डाकू वसाके या ८३ वर्षीय वृद्धाचा भोवळ येऊन मृत्यू झाला होता.• ३० मे रोजी भाष्कर तरारे या ५२ वर्षीय मांडळ (ता. लाखांदूर) येथील गुराख्याचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २८ मेच्या दुपारी गुरे चारताना तो भोवळ येऊन पडला होता. दोन दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तो सहावा बळी ठरला आहे.

"झालेल्या या आकस्मिक मृत्यूची दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. वाढत्या उष्णतेमुळे हे घडण्याची शक्यता असल्याने उष्माघाताचे मृत्यू असे म्हणता येईल. या संदर्भात शासकीय स्तरावरुन मदतीचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहे."- डॉ. मिलींद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा 

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमान