बनावट रॉयल्टी असलेला रेतीचा ट्रक दंड घेऊन सोडला
By Admin | Updated: October 31, 2015 01:43 IST2015-10-31T01:43:54+5:302015-10-31T01:43:54+5:30
गोंदिया जिल्ह्यातील रेतीच्या रॉयल्टीवर ट्रकमध्ये रेती भरुन आणत असताना परसोडी-सौंदड येथे रेतीचा ट्रक पकडण्यात आला.

बनावट रॉयल्टी असलेला रेतीचा ट्रक दंड घेऊन सोडला
चौकशीची मागणी : साकोली तहसील कार्यालयाची कारवाई
साकोली : गोंदिया जिल्ह्यातील रेतीच्या रॉयल्टीवर ट्रकमध्ये रेती भरुन आणत असताना परसोडी-सौंदड येथे रेतीचा ट्रक पकडण्यात आला. पंरतु महसुल विभागाने ट्रकचालकाची चौकशी केली असता त्याच्याजवळ रॉयल्टी आढळून आली. ही रॉयल्टी बोगस असल्याच्या कारणावरुन तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रक मालकाकडून दंड घेऊन व ट्रक सोडून देण्यात आला.
परसोडी सौंदड येथे शुक्रवारला सकाळी रेती वाहतूक करणारा एक ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमध्ये रेती असल्याने महसुल विभागाने हा ट्रक साकोली तहसिल कार्यालयात आणला. या ट्रक चालकाजवळ गोंदिया जिल्ह्यातील रेतीघाटाची रॉयल्टी असल्याने त्याने ती रॉयल्टी दाखविली. मात्र सदर रॉयल्टी ही बनावट असून या रॉयल्टीवर तहसिलदारांची सही नव्हती. या कारणावरुन महसुल विभागाने या ट्रकमालकाकडून १५,८०० रुपयांचा दंड वसुल करुन ट्रक सोडून दिला. (तालुका प्रतिनिधी)