डिझेल दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागला
By Admin | Updated: August 23, 2014 23:48 IST2014-08-23T23:48:06+5:302014-08-23T23:48:06+5:30
डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस तिकीटदरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. महिनाभरात बसच्या तिकीटात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे.

डिझेल दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागला
भंडारा : डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस तिकीटदरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. महिनाभरात बसच्या तिकीटात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याचा काहीसा फटका प्रवाशांना बसणार आहे.
एसटीच्या माध्यमातून आंतरराज्यीय तथा राज्यांतर्गत शहर ते गाव खेड्यापर्यंत बसेस धावतात. एसटीने साधारण, जलद आणि रात्र सेवेमध्ये भाडे वाढ केली आहे. ही भाडे वाढ सहा किलोमिटरच्या एका टप्प्यामागे पाच पैशाने वाढणार असून ती ०.८१ टक्के एवढी राहणार आहे. त्यामुळे साधारण, जलद आणि रात्र सेवेमधील प्रती आठ कि़मी. साठी ही पाच पैशाची भाडे वाढ तर निमआराम सेवेत प्रति सहा कि़मी. साठी १० पैशाची वाढ आहे. आता दुसऱ्या टप्प्यात झालेल्या दरवाढीत सहा कि.मी. च्या पहिल्या टप्प्यासाठी ही वाढ झाली आहे.
ग्रामीण जनतेला दिलासा मिळाला असून साधारण व जलद सेवेच्या पहिल्या ३० कि़मी. च्या प्रवासासाठी वाढ करण्यात आलेली नाही. ३१ ते १५० कि़मी.च्या प्रवासासाठी एक रूपयांनी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे.
पुर्वी सहा कि़मी. च्या टप्प्यासाठी सहा रूपये २० पैसे होते. त्यात वाढ होवून आता सहा रूपये २५ पैसे झाली होती.
दुसऱ्या टप्प्यात यात पाच पैशाची वाढ झाली असून आता सहा रुपये ६ रुपये ३० पैसे एका टप्प्याला आकारण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)