डाकसेवकांच्या संपामुळे उत्तरपत्रिकेचे गठ्ठे पडून
By Admin | Updated: March 14, 2015 00:55 IST2015-03-14T00:55:49+5:302015-03-14T00:55:49+5:30
नागपूर विभागातील ग्रामीण डाकसेवकांनी बेमूदत संप १० मार्चपासून पुकारला आहे. तुमसर तालुक्यात २२५ डाकसेवक असून जिल्हयात ४६० तर विभागाला ...

डाकसेवकांच्या संपामुळे उत्तरपत्रिकेचे गठ्ठे पडून
भंडारा/ तुमसर : नागपूर विभागातील ग्रामीण डाकसेवकांनी बेमूदत संप १० मार्चपासून पुकारला आहे. तुमसर तालुक्यात २२५ डाकसेवक असून जिल्हयात ४६० तर विभागाला ११५८ डाकसेवकांचा समावेश आहे. सध्या १० व १२ वीच्या परिखा सुरु असल्याने उत्तरपत्रिकांचा ढीग डाक कार्यालयात पडून आहे. स्पर्धा परीक्षार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संपाचा इशारा दिला आहे. तुमसर येथे मुख्य डाकघरासमोर डाकसेवकांनी बेमुदत संप सुरु केला. यात ग्रामीण डाक सेवकांना ६ व्या वेतन आयोगात सामिल करणे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, कामाचे आठ तास घेऊन खात्यात समाविष्ट करणे, मृतकाच्या वारसांना १०० टक्के अनुकंपा तत्वावर नियुक्त करणे, पोस्टमन व एमटीएस भरती बाहेरुन बंद करन ग्रामीण डाकसेवकांना सरळ सेवा भरती, पदोन्नतीनुसार देणे, पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० पदोन्नती पगार देणे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.
पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांना जास्त वेतन देऊन कमी कामे करावी लागतात तर मानधनावर ग्रामीण भागात ८ ते १० गावांचा समावेश असल्याने जास्त कामे करुन अल्पशा केवळ ५ ते ८ हजार मानधनावर कामे करावी लागतात. ही तफावत दूर करण्याची मागणी डाकसेवक कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सध्या १० व १२ वीच्या परिक्षा सुरु असल्याने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे ग्रामीण डाकघरात पडून आहेत. त्यांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून त्याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संघटनेचे अध्यक्ष एम. पी. बेले, कार्यकारी अध्यक्ष जे. बी. कावळे, पी. टी. शिंगाडे, आर. एस. लिल्हारे यांनी आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)