शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

दर करार बंद झाल्याने लाभार्थ्यांचे ‘अ’कल्याण

By admin | Updated: February 12, 2017 00:19 IST

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी वस्तुस्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

रोख आणायची कुठून? : कल्याणकारी योजनांच्या साहित्यांचे लाभार्थ्यांना वाटप होईनाप्रशांत देसाई भंडाराशासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी वस्तुस्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना साहित्य खरेदी करावे लागणार आहे. अनेकांची परिस्थिती ‘हातावर आणून पाणावर खाणे’ अशी असल्याने व दरकरार बंद झाल्याने यातील ‘कमिशन’ मिळणार नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये याबाबत आता निरूत्साह दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या साहित्य खरेदीचा फटका लाभार्थ्यांना बसणार आहे.राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारितील शासकीय कार्यालयांतून विविधस कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे हा या मागील उद्देश असला तरी, अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत नव्हता. अनेकांची याबाबत नेहमी ओरड राहत असल्याने यावर्षी शासनाने दरकरारावर खरेदी करण्यात येणारी ही योजनाच बंद केली आहे. आता लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार साहित्य खरेदी करण्याचे अधिकार शासनाने दिलेले आहे. त्या साहित्य खरेदीसाठी लागलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र, यातही आता अनेक अडचणी समोर येत आहेत. शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. जेणेकरून लाभार्थ्यांना योजनांचा पूर्णपणे लाभ मिळेल आणि आनावश्यक गोष्टी टळू शकतील. सद्यस्थितीत डीबीटी अंतर्गत अनेक योजना अंतर्भूत असून या सर्व योजनांमध्ये रोख रकमेच्या स्वरूपात अनुदान देण्यात येते. डीबीटी कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण यांच्यासह मंडळे व महामंडळांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो. आता लाभार्थ्यांना स्वत:जवळची अधिकची रक्कम टाकून उच्च दर्जाचे साहित्य खरेदी करण्याची मूभा दिलेली आहे. मात्र, ही खरेदी सर्वप्रथम लाभार्थ्यांना स्वत:च्या रकमेतून करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांनी साहित्य खरेदी केल्याची खातरजमा झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात रोख जमा करण्यात येईल. कमिशन बंदने सर्व झाले हतबलयावपूर्वी लाभार्थ्यांना या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध कार्यालयातून दरकरार प्रक्रिया राबविली जात होती. यात मोठ्या प्रमाणात कमिशनच्या माध्यमातून अनियमितता होत असल्याची ओरडे होती. दरकरार प्रक्रिया बंद करून थेट अनुदान बँक खात्यावर असा प्रकार झाल्याने कमिशनखोरीत अडकलेल्यांसमोर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे यावर्षी कमिशनखोरी करणाऱ्यांना लाभ मिळत नसल्याने अनेक विभागाच्या लाभार्थ्यांच्या यादींना अंतिमस्वरूप मिळलेले नाही. मागिल वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत यादीला अंतिमरूप मिळाले होते, हे विशेष.मार्चपूर्वी निधी खर्च होणे आवश्यकआर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपते. लाभार्भ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासनास्तरावर हालचाली थंडबस्त्यात आहे. त्यामुळे कोट्यवधींचा निधी शासकीय तिजोरीत पडून आहे. मार्चपूर्वी हा निधी खर्च होणे गरजेचे आहे. अनेकांचे नाव यादीत असले तरी, त्यांच्याकडे साहित्य खरेदीसाठी पैसे नाहीत. लाभार्थ्यांनी खरेदी केलेले साहित्य बघितल्यानंतर त्यांना रक्कम मिळणार असल्याने लाभार्थीही काहिप्रमाणात आता निरूत्साही दिसून येत आहे. त्यामुळे मार्चपूर्वी या निधीतून साहित्य खरेदी करणे लाभार्थी व शासकीय यंत्रणेला गरजेचे आहे. अन्यथा कोट्यवधी रूपयांचा प्राप्त झालेला निधी परत जाण्याची भीती आहे.