रेतीच्या बारीक कणांमुळे वाहनचालक त्रस्त
By Admin | Updated: July 11, 2015 01:40 IST2015-07-11T01:40:19+5:302015-07-11T01:40:19+5:30
पवनी तालुक्यात अनेक रेतीघाट आहेत. वैनगंगा नदी पात्रातील रेतीची विदर्भात मागणी असल्यामुळे ट्रक, टिप्परचा सहायाने दुरपर्यंत रेतीचा पुरवठा केला जात आहे.

रेतीच्या बारीक कणांमुळे वाहनचालक त्रस्त
पवनी/पालोरा : पवनी तालुक्यात अनेक रेतीघाट आहेत. वैनगंगा नदी पात्रातील रेतीची विदर्भात मागणी असल्यामुळे ट्रक, टिप्परचा सहायाने दुरपर्यंत रेतीचा पुरवठा केला जात आहे. ट्रक चालक रेतीघाटावरून रेती भरून आणतात; मात्र रेतीवर कोणत्याही प्रकारचे आवरण ताळपत्री टाकीत नसल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रेतीचे कण वाहन चालकांच्या डोळ्यात जात असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात अपघात घडत आहेत.
पवनी तालुक्यात इटगाव, कुर्झा, येनोळा, जुनोना, वलणी, शिमनाळा, गुडेगाव, पवनी आदी रेतीघाटाचा समावेश येतो. रेतीची वाहतूक करणाऱ्यांना प्रशासनाकडून काही नियम दिले आहेत. यात रेती क्षमतेपेक्षा जास्त भरू नये, रेती ट्रकमध्ये भरले असता त्यावर पांघरून घालणे अशा प्रकारे असे अनेक नियम बांधून दिले आहेत. मात्र ट्रक मालक प्रशासनाच्या आदेशाला घाब्यावर ठेवून स्वमर्जी करीत आहेत. दररोज शेकडो ट्रॅक, ट्रॅक्टर रेतीचा पुरवठा दररोज करतात. जे ट्रक शहरी भागात जातात अशा ट्रॅक्टर रेती उडू नये पांघरून घातले जाते. मात्र तालुक्यात किंवा जवळपास रेतीपुरवठा करणारे ट्रक, ट्रॅक्टर रेतीवर काहीही झाकत नाही.
खुलेआम दिवसा ढवळ्या रेती पुरवठा केला जातो. रेतीवर काहीही झाकत नसल्यामुळे दुचाकी चालकांच्या डोळ्यात रेतीचे कण जातात. यामुळे बरेच अपघात झाले आहेत. अनेकांना डोळयांचे आजार बळावले आहे. पोलीस प्रशासन व महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत आहेत. रेतीचे ट्रक किंवा ट्रॅक्टर तपासणीचे काम महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाचे अधिकारी कोणतीही कारवाई करित नसल्याचे चित्र आहे. पोलीस विभागाकडून वाहतूक पोलीस गस्तीवर असतात. या संदर्भात एक वाहतूक पोलिसासोबत संपर्क साधला असता त्यांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही कार्यवाही केली असता पुढाऱ्यांचा दबाव येतो. हप्ता कमी व्हायला नको, अशी तंबी दिली जाते. त्यामुळे रेती मालकांवर दंड वसूल न करता एंट्रीच्या नावाखाली रक्कम गोळा केली जाते. जनतेचे रक्षण करणारे अधिकारी जर भक्षक बनत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न आहे.
दर आठवड्याला दवाखान्यात अनेक रुग्ण रेतीचे बारीक कण डोळ्यात गेले म्हणून येतात. डोळ्यात बारीक कण गेल्यानंतर डोळ्यांना चोळतो त्यामुळे डोळ्यात मोठ्या जखमा होतात. डोळ्यात रेतीचे कण अथवा कोणतेही बारीक कण गेले असता त्याला चोळू नये, डोळे पाण्याणे स्वच्छ धुतल्यास बारीक कण बाहेर निघत असते, असे डॉ. अजय भालाधरे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)