ड्रम सिडर कमी खर्चाचे तंत्रज्ञान वापरून शेती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:53+5:302021-07-16T04:24:53+5:30

मोहाडी तालुक्यातील पहिला प्रयोग मोहाडी : खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाची सुरुवात कमी-अधिक प्रमाणात झाली आहे. परंतु पावसाचा अनियमितपणा दिसून ...

Drum cider should be cultivated using low cost technology | ड्रम सिडर कमी खर्चाचे तंत्रज्ञान वापरून शेती करावी

ड्रम सिडर कमी खर्चाचे तंत्रज्ञान वापरून शेती करावी

मोहाडी तालुक्यातील पहिला प्रयोग

मोहाडी : खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाची सुरुवात कमी-अधिक प्रमाणात झाली आहे. परंतु पावसाचा अनियमितपणा दिसून येत आहे. या पावसाच्या लपंडावामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. पेरणीकरिता पऱ्हे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांना साधता आल्या नाही. पऱ्हे बिघडल्यावर दुबार पेरणीकरिता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते.

अशा संवेदनशील हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात धान शेतीतील उत्पादकतेवर निश्चितच परिणाम होणार आहे. म्हणून भंडारा येथील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्यावतीने ‘ड्रम सिडर’ या कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान लागवडीसाठी व्हावा म्हणून तालुक्यातील कवडसी, खुर्चिपार, टाकळी तसेच मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव येथील तरुण शेतकरी मनोज कस्तुरे यांच्या शेतावर बुधवार १४ जुलैला तालुक्यात ड्रम सिडरचा पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे़ त्यावेळी ग्रामीण व प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, विलास केजरकर, सरपंच सदाशिव ढेंगे, अभियंता चेतन सव्वालाखे, पट्टू लिल्हारे, शेतकरी मनोज कस्तुरे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी ‘ड्रम सिडर’चे महत्त्व सांगितले. ड्रम सिडर हे तंत्रज्ञान वापरून धान बियाणांची रोप तयार न करता सरळ पेरणी करता येते. बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून अंकुरित करावे, अंकुर खूप लांब येऊ नये ही, काळजी घ्यावी कारण त्यामुळे धान बियाणे एकमेकात अडकून ड्रम सिडर मध्ये राहण्याची शक्यता असते. रात्रभर भिजलेले बियाणे पेरणीपूर्वी सावलीत सुकवून कोरडे करावे. पेरणीपूर्वी शेतात चिखलणी करावी. अधिकचे पाणी काढून घ्यावे ड्रम सिडरद्वारे पेरणी केल्यास शेतातील दोन ओळींचे अंतर २०-२० सेमी तर दोन रोपांतील अंतर ५ ते १० सेमीपर्यंत कमी करता येते. चिखलणी केलेल्या समांतर शेतावर याचा वापर करता येतो. या पद्धतीत हेक्टरी ३५ ते ४० किलो बियाणे लागते. मजुरावरील खर्च कमी लागतो. वेळेतही बचत होते. उत्पादनात वाढ होऊन अपेक्षित उत्पन्न मिळत असते असे मत ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या समक्ष शेतकरी मनोज कस्तुरे यांनी अर्धा एकर शेतीवर ड्रम सिडरच्या माध्यमातून धानाला कोंब आलेल्या धानाची लागवड केली. तसेच ड्रम सिडरच्या माध्यमातून धान रोवणी केल्यास रोवणीसाठी लागणाऱ्या मजुरांचा खर्च व पऱ्हे न घालता तसेच वेळेची बचत या सर्व बाबींवर विचार केला असता, ड्रम सिडरच्या माध्यमातून धान रोवणी करणे, अल्पभूधारकांनी वरदानदायक शेती करणे फायद्याची ठरेल, असे मत हरदोली येथील सरपंच सदाशिव ढेंगे यांनी व्यक्त केले आहे. ड्रम सिडरच्या माध्यमातून धान रोवणी करणे हा मोहाडी तालुक्यातील पहिलाच प्रयोग आहे.

Web Title: Drum cider should be cultivated using low cost technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.