ट्रॅक्टरखाली चिरडून चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST2021-02-20T05:00:00+5:302021-02-20T05:00:47+5:30
संदीप रमेश कळमकर (२८) रा. गाेसे खुर्द असे मृताचे नाव आहे. गुरुवारी ताे ट्रॅक्टर ट्राॅलीत गिट्टी भरुन जात हाेता. मात्र अचानक त्याचे ट्रॅक्टरवरुन नियंत्रण गेले. ट्रॅक्टर थेट शेतात शिरला. गिट्टी भरलेली ट्राॅली उलटली. त्याचवेळी संदीप खाली काेसळला आणि ट्रॅक्टरच्या माेठ्या चाकाखाली चिरडला गेला. मात्र मदतीसाठी तेथे कुणीही नव्हते.

ट्रॅक्टरखाली चिरडून चालक जागीच ठार
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गिट्टी घेवून जाताना नियंत्रण गेल्याने शेतात जावून उलटलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून चालक जागीच ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील साेमनाळा ते पिंपळगाव निपाणी दरम्यान गुरुवारी घडली.
संदीप रमेश कळमकर (२८) रा. गाेसे खुर्द असे मृताचे नाव आहे. गुरुवारी ताे ट्रॅक्टर ट्राॅलीत गिट्टी भरुन जात हाेता. मात्र अचानक त्याचे ट्रॅक्टरवरुन नियंत्रण गेले. ट्रॅक्टर थेट शेतात शिरला. गिट्टी भरलेली ट्राॅली उलटली. त्याचवेळी संदीप खाली काेसळला आणि ट्रॅक्टरच्या माेठ्या चाकाखाली चिरडला गेला. मात्र मदतीसाठी तेथे कुणीही नव्हते. तब्बल पाच तासानंतर हा प्रकार लक्षात आला. परंतु ताेपर्यंत उशिर झाला हाेता. या अपघातात संदीपचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रमाेद राघाेबा काेरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नाेंदविला.