ट्रक अपघातात चालक ठार
By Admin | Updated: July 25, 2016 00:35 IST2016-07-25T00:35:33+5:302016-07-25T00:35:33+5:30
भरधाव आलेल्या दोन ट्रकमध्ये आमोरासामोर भीषण धडक झाली. या अपघातात चालक ठार झाल्याची घटना ...

ट्रक अपघातात चालक ठार
भुयार : भरधाव आलेल्या दोन ट्रकमध्ये आमोरासामोर भीषण धडक झाली. या अपघातात चालक ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री
ीुयारजवळ घडली.
नागपूर येथून एम एच ३४ ए.बी. १३६९ हा ट्रक आलू - कांदे भरून येत होता. तर त्याच्या विरुध्द दिशेने नागभीडकडून ट्रक क्रमांक ए. पी. ०२ एक्स ९१९३ हा ट्रक टमाटर भरुन भंडाऱ्याला जात होता. मध्यरात्रीच्या सुमारास भुयारजवळ भरधाव असलेल्या या दोन्ही ट्रकच्या चालकांचे वाहनावरील नियंत्रध सुटल्याने एकमेकांवर आदळले. यात ट्रक क्र. एम. एच. ३४ ए. बी. १३६९ चा चालक सिबु कार्तेकयन पनीकर (५०) रा. अंतरीकल ता. कुडाल जि. पतनमतेटा (केरळ) याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पवनी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)